• Download App
    PM Narendra Modi's Office PMO Becomes Service Shrine!! पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कार्यालय PMO बनले सेवा तीर्थ!!

    पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कार्यालय PMO बनले सेवा तीर्थ!!

    PM Narendra Modi'

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या कार्यकाळात बऱ्याच शहरांची नावे बदलली, त्यांच्याच कार्यकाळात नवीन संसद अस्तित्वात आली. पंतप्रधान मोदींनी नव्या संसद भवनाचे उद्घाटन 28 मे 2023 रोजी सावरकर जयंतीच्या दिवशी केले.PM Narendra Modi’s Office PMO Becomes Service Shrine!!

    पण त्यापलीकडे जाऊन त्यांनी राजधानी मध्ये इंग्रजांच्या काळात बनलेल्या राज्यव्यवस्थांची आणि सरकारी निवासस्थानांची नावे बदलून टाकली. राजपथचे नाव कर्तव्य पथ केले, त्याचबरोबर गृह मंत्रालय, संरक्षण मंत्रालय अर्थ मंत्रालय तसेच अन्य मंत्रालयांची नावे बदलून ती कर्तव्य भवनात नेली.



    आता त्या पुढचे पाऊल टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे पंतप्रधान कार्यालय अर्थात PMO चे नाव बदलून ते सेवा तीर्थ असे ठेवले आहे. सेवा तीर्थ 1, सेवा तीर्थ 2 आणि सेवा तीर्थ 3 अशा विभागांमध्ये PMO चालेल. त्यापैकी सेवा तीर्थ 1 मध्ये खुद्द पंतप्रधानांचे कार्यालय असेल, तर सेवा तीर्थ 2 मध्ये मंत्रिमंडळ सचिवालय अर्थात कॅबिनेट सेक्रेटरीएट आणि सेवा तीर्थ 3 मध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचे कार्यालय म्हणजेच national security advisor चे कार्यालय असेल.

    सेवा तीर्थ 2 मध्ये कॅबिनेट सचिव टी. व्ही. सोमनाथ यांनी नुकतीच सैन्य दलाच्या चार प्रमुखांची बैठक घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे South block मधले कार्यालय सुद्धा लवकरच सेवा तीर्थ 1 मध्ये स्थलांतरित होईल.

    – राज भवन बनली लोक भवन

    त्याबरोबरच केंद्र सरकारने विविध राज्यांच्या राजधान्यांमध्ये असलेले राज भवनांचे नाव बदलून लोक भवन असे ठेवले आहे. त्याची अंमलबजावणी अनेक राज्यपालांनी करून राज भवनांचे नामकरण लोक भवन करण्याची अधिसूचना काढली.

    PM Narendra Modi’s Office PMO Becomes Service Shrine!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mukesh Ambani : मुकेश अंबानी म्हणाले- जिओ AI प्लॅटफॉर्म लाँच करणार; गुजरातमध्ये ₹7 लाख कोटींची गुंतवणूक करणार

    PM Modi : पीएम मोदी म्हणाले-राजकोटला मिनी जपान म्हणालो तेव्हा माझी खिल्ली उडवली, आज येथे स्क्रू ड्रायव्हरपासून रॉकेटपर्यंतचे भाग बनतात

    Pakistani Drones : सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये LoC वर 5 ड्रोन दिसले:दावा- पाकिस्तान घुसखोरीच्या प्रयत्नात; सैन्याचा प्रतिहल्ला, शोधमोहीम सुरू