वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत काँग्रेसला दिलेले प्रत्युत्तर देशभर सगळीकडे गाजत आहेच. पण त्या पलिकडे मोदींच्या निळ्या रंगाच्या जॅकेटची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. हे निळे जॅकेट परिधान करून मोदी आज कामकाजात सहभागी झाले होते. प्लॅस्टिकच्या पाण्याच्या फेकलेल्या बाटल्यांचा फेरवापर करून तयार केलेल्या कापडाचे जॅकेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परिधान केले होते. pm narendra modi weares plastic bottle waste recycled cloth jacket in parliament
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोमवारी हे जॅकेट भेट म्हणून देण्यात आले. बंगळुरू येथे इंडियन ऑइल कंपनीचा एनर्जी वीक साजरा करण्यात येतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी या सप्ताहाचं उद्घाटन केले. यावेळी त्यांना हे जॅकेट भेट देण्यात आले होते. प्लॅस्टिकच्या एकदा वापरून फेकून देण्यात आलेल्या बाटल्यांपासून तयार केलेल्या कापडापासून हे जॅकेट शिवले आहे. याच कपड्यांत शिवलेले युनिफॉर्म आता इंडियन ऑइल कंपनीचे कर्मचारी तसेच सहायकांना युनिफॉर्म दिले जाणार आहेत. पेट्रोल पंपावरील सहाय्यकांसाठी ही खास योजना कंपनीने आखली आहे.
पंतप्रधान मोदींनी हे जॅकेट परिधान करून संसदेच्या कामकाजात सहभागी होऊन पर्यावरण रक्षणाचा प्लॅस्टिकच्या फेरवापराचा सामाजिक आणि पर्यावरणपूरक संदेशच दिला आहे.
pm narendra modi weares plastic bottle waste recycled cloth jacket in parliament
महत्वाच्या बातम्या
- जी २० देशांमधील पर्यटक आणि व्यापारी यांना भारतात युपीआय पेमेंटची सुविधा
- रेपो दर ६.५० टक्के – महागाई आटोक्यात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेची पावले, पण सामान्यांना महागाईचे चटके
- अदानी ते मोदी, खर्गे ते राहुल – संसदेत विरोधकांच्या आरोपांच्या समाचारासाठी पंतप्रधानांची तोफ सज्ज, दुपारी ३.०० नंतर पंतप्रधानांचे उत्तर