प्रेडिएटर ड्रोन हा सध्या जगातील सर्वात अत्याधुनिक सैन्य ड्रोन समजला जातो.
वृत्तसंस्था
वॉशिंग्टन: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकाचा दौरा करत आहेत. या दौऱ्यात काही महत्त्वाच्या संरक्षण डील होण्याची शक्यता आहे. अमेरिकेकडून भारत 30 प्रीडेटर ड्रोन ( 30 Predator drones) खरेदी करणार असल्याने पंतप्रधान मोदी ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या CEOसोबत बैठक करणार आहेत. PM Narendra Modi US Visit : India to buy 30 Predator armored drones from US Modi meets CEOs of drone maker General Atomics
जनरल एटॉमिक्स (General Atomics) कंपनी -पंतप्रधान मोदी 4 टॉप कंपन्यांच्या सीईओंशी थेट भेट घेणार. PM Narendra Modi US Visit : India to buy 30 Predator armored drones from US Modi meets CEOs of drone maker General Atomics
सध्या मिळालेल्या माहितीनुसार, Apple कंपनीचे सीईओ टिम कूक (Apple CEO Tim Cook) हेही या बैठकीत भाग घेणार होते, मात्र आरोग्य विषयक कारणांमुळे ते याबैठकीला हजर राहू शकणार नाही. दरम्यान, ज्या सीईओंसोबत मोदींची बैठक होणार आहे, त्यांनी भारतात गुंतवणूक केली तर, भारत अनेक बाबतीत प्रगती करु शकतो. (Global Resilient chain) यातील काही कंपन्या सोलार उर्जा निर्मिती करणाऱ्या आहेत, काही संरक्षण साहित्य निर्मिती करणाऱ्या तर काही रोजगार निर्मिती करणाऱ्या आहे.
प्रेडिएटर ड्रोन हा जगातील सर्वात अत्याधुनिक सैन्य ड्रोन –
भारतीय सैन्यात या ड्रोनच्या येण्यानं, आपली ताकद कमालीची वाढणार आहे. हे सगळे मानवरहित ड्रोन असल्याने, सैनिकांच्या जीवितहानीची शक्यता नसते. हा ड्रोन हार्ड प्वाईंटसोबत येतो, ज्यात हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या मिसाईल्स लावता येतात.
शिवाय सेंसर आणि लेजर गायडेड बॉम्बचाही या ड्रोनद्वारे शत्रूवर हल्ला करता येतो. यूएवी 50,000 फूटांवरूनही संचालित केला जाऊ शकतो आणि हा ड्रोन शत्रूच्या नजरेत न येता तब्बल 27 तास हवेत राहू शकतो. या ड्रोनद्वारे हेरगिरी करता येते, विमानांवर लक्ष्य ठेवता येतं आणि प्रसंगी हल्लाही करता येतो.
अमेरिकेसोबत संरक्षण करार-
अफगाणिस्तानातील परिस्थिती, पाकिस्तानचे भ्याड हल्ले आणि चीनच्या कुरघोड्या पाहता आता भारत आपली सैनिकी शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळेच भारताने आता तब्बल 30 सशस्र ड्रोन (Drone) खरेदीची योजना तयार केली आहे. यासाठी 3 अब्ज डॉलर म्हणजेच तब्बल 22 हजार कोटी रुपये लागणार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत तिन्ही सैन्यदलांसाठी 10-10 एमक्यू-9 रिपर ड्रोन विकत घेण्याची योजना तयार करत आहे.
PM Narendra Modi US Visit : India to buy 30 Predator armored drones from US Modi meets CEOs of drone maker General Atomics
महत्त्वाच्या बातम्या
- भारतीय कंपनीची अमेरिकी शेअर बाजारात कमाल, आयपीओ येताच 500 कर्मचारी झाले कोट्यधीश
- पंजाबात भारत-पाकिस्तान सीमेवर तीन दहशतवाद्यांना अटक; हँड ग्रेनेड, 11 काडतुसे आणि पिस्तूल जप्त
- राज्यसभा बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसचे पटोले-थोरात फडणवीसांच्या भेटीला, सत्तेतील सहकारी राष्ट्रवादी-शिवसेना नाराज!
- सरकारने निवडणुकीची थट्टा मांडली, प्रभागरचनेचा उद्देश सांगावा, लोकांनी एकावेळी किती बोटं दाबायची? नाशकात राज ठाकरेंचा हल्लाबोल
- Corona Spread : लाओसच्या गुफांमध्ये आढळली कोरोनाचा संसर्ग पसरवणारी वटवाघुळे, शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा