विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या तिसऱ्या टर्मच्या कारभाराची सुरुवातच शेतकऱ्यांच्या लाभाच्या वाटपाने सुरू केली. PM Narendra Modi today took charge as the Prime Minister, in New Delhi.
काल सायंकाळी मोदी मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला. तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान निधीच्या 17 व्या हप्त्याचे अधिकृत वितरण करणाऱ्या त्यांच्या पहिल्या फाइलवर स्वाक्षरी केली. यामुळे 9.3 कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल आणि सुमारे 20,000 कोटी रुपयांचे वितरण होईल.
तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साऊथ ब्लॉक मध्ये प्रवेश करतात तिथल्या सगळ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कॉरिडॉरमध्ये दुतर्फा उभे राहून टाळ्यांच्या गजरात मोदींचे स्वागत केले मोजणी या सर्वांना अभिवादन करत पंतप्रधानांच्या दालनात प्रवेश करून पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी तिसऱ्या कालकालातील पहिली सही शेतकऱ्यांच्या लाभाच्या वितरणावर केली.
PM Narendra Modi today took charge as the Prime Minister, in New Delhi.
महत्वाच्या बातम्या
- नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा झाले भारताचे पंतप्रधान!
- सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनत मोदींची नेहरूंच्या रेकॉर्डशी बरोबरी; नड्डा, शिवराज, मनोहरलाल यांच्या मंत्रिपदी शपथविधीने भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची उत्सुकता वाढली!!
- Modi 3.0 : माध्यमांमधली पतंगबाजी सोडून सरकार नेमके काय आणि कसे बदलेल??, आर्थिक, सामाजिक अजेंडा कसा असेल??
- मणिपूरमध्ये वृद्धांच्या हत्येमुळे पुन्हा उसळला हिंसाचार; जिरीबाममधील 200 मैतेईंनी घरे सोडली