वृत्तसंस्था
हुबळी : भारतच लोकशाहीची जननी आहे. पण लंडनमध्ये तिला आजही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. कर्नाटकात हुबळी धारवाडमध्ये विविध विकास कामांचे लोकार्पण केल्यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत मोदींनी राहुल गांधींच्या लंडन दौऱ्यावर निशाणा साधला. PM Narendra modi targets rahul Gandhi over his speeches on democracy in India in London
पंतप्रधान मोदी म्हणाले, भारत आज केवळ जगातली सगळ्यात मोठी लोकशाही नाही, तर भारतभूमी लोकशाहीची जननी देखील आहे. पण याच लोकशाहीला लंडनमध्ये आरोपीच्या पिंजऱ्यात काही लोकं उभे करत आहेत. काही वर्षांपूर्वी लंडनमध्ये महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी मला मिळाली आणि त्याच लंडनमध्ये काही लोकांनी भारताच्या लोकशाहीची थट्टा मांडली. लोकशाही विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हे दुर्दैवी आहे, अशा शब्दांत नरेंद्र मोदींनी राहुल गांधींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
राहुल गांधी गेल्या काही दिवसांमध्ये लंडनमध्ये केंब्रिज विद्यापीठासह वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भारतातल्या लोकशाहीवर व्याख्याने देत होते. भारतातली लोकशाही धोक्यात आहे. लोकशाही संस्थांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या फॅसिस्ट संघटनेचा कब्जा आहे. असे आरोप राहुल गांधींनी केले होते. राहुल गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना बोका हराम सारख्या दहशतवादी संघटनेशी देखील केली होती.
राहुल गांधींच्या आरोपांचा भाजपने वेगवेगळ्या वेळी समाचार देखील घेतला होता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आतापर्यंत त्या विषयावर बोलले नव्हते. हुबळी धारवाड मध्ये प्रथमच त्यांनी भारतीय लोकशाही वर भाष्य करून राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. भारतातल्या लोकशाही परंपरा एवढ्या मजबूत आहेत की जगातला कोणताही देशात वा कोणतीही शक्ती या लोकशाही परंपरेला धक्का पोहोचवू शकत नाही, असा निर्वाळाही पंतप्रधान मोदींनी दिला.
PM Narendra modi targets rahul Gandhi over his speeches on democracy in India in London
महत्वाच्या बातम्या
- ब्रिटिश सरकारवर टीका केल्याने बीबीसीने क्रीडा तज्ज्ञाला काढून टाकले, भारताचा सवाल- ही कसली पत्रकारिता?
- वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : पुढील वर्षी पूर्ण होणार देहू-आळंदी ते पंढरपूर पालखी मार्ग, मार्ग चौपदरी होण्याची गडकरींची ग्वाही
- हैदराबादेत पोहोचले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आज CISF स्थापना दिन परेडमध्ये होणार सहभागी
- P.M.मोदींचे सानिया मिर्झाला पत्र, इतर खेळाडूंना मिळाले इन्स्पिरेशन!