विशेष प्रतिनिधी
मोरेना : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवरचे हल्ले आणखीन प्रखर करत असा वारसा हक्क कायद्यावर काँग्रेसला पट्ट्यात घेतले आहे. वारसा हक्क कायदा संदर्भात काँग्रेसची पोल खोलताना पंतप्रधान मोदींनी त्या पक्षाचा सगळ्यात जुना इतिहास जनतेसमोर खोदून काढला आहे. PM Narendra Modi says Rajiv Gandhi scrapped inheritance law to save tax
मध्य प्रदेशातील मोरेना येथे भाजपच्या प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची नावे घेऊन काँग्रेसवर तुफानी हल्ला चढविला. पंतप्रधान मोदी म्हणाले, आज काँग्रेसचा काळा इतिहास मी तुम्हाला सांगायला आलो आहे. आज काँग्रेसवाले तुमच्या वारसा हक्काच्या संपत्तीवर डोळा ठेवून ती हडपण्यासाठी वारसा हक्क टॅक्स लावण्याच्या बेतात आहेत, पण ज्यावेळी खुद्द गांधी परिवारावरच वारसा हक्क टॅक्स भरायची वेळ आली, त्यावेळी राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना वारसा हक्क कायदा रद्द करून टाकला होता, याची आठवण पंतप्रधान मोदींनी काँग्रेस सह संपूर्ण देशाला करून दिली.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ज्यावेळी इंदिरा गांधींचे निधन झाले, त्यावेळी इंदिरा गांधींची चार पिढ्यांची सगळी संपत्ती आपल्याला मिळावी. सरकारला त्याचा कायदेशीर वाटा देखील मिळू नये, यासाठी राजीव गांधींनी पूर्वीपासून भारतात चालत आलेला वारसा हक्क कायदा रद्द करून टाकला, पण देशाला त्याचा कायदेशीर वाटा मिळू दिला नाही. पण आज तीच काँग्रेस देशातल्या सर्वसामान्य नागरिकांचे हक्क हिरावून घेताना त्यांच्यावर वारसा हक्क कायदा लागून त्यांच्या त्यांच्या वारस संपत्तीचा वाटा देखील हडपण्याच्या बेतात आहे.
– काँग्रेसने ओबीसींचे आरक्षण मुस्लिमांना दिले
काँग्रेसचे इरादे खराब आहेत. त्यांना ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा टक्का घटवून तो मुस्लिम समाजाला द्यायचा आहे. कर्नाटकात त्यांनी तो प्रयोग करून पाहिल्यानंतर तो प्रयोग जसाच्या तसा त्यांना देशात राबवायचा आहे. कर्नाटकात मुस्लिमांमधल्या सगळ्या जातींना काँग्रेस सरकारने ओबीसींच्या आरक्षणातल्या टक्केवारीचा वाटा मुस्लिमांना दिला. ओबीसींवर अन्याय केला. तोच प्रयोग त्यांना देशात सगळीकडे करायचा आहे आणि तो प्रयोग हाणून पाडण्यासाठी देशातल्या जनतेने भाजपला आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 400 पेक्षा जास्त जागा दिल्या पाहिजेत, की जेणेकरून आम्ही असा कठोर कायदा आणू, की काँग्रेस धर्माच्या आधारावर भविष्यकाळात कधीच आरक्षण लागू करू शकणार नाही आणि ओबीसी, दलित, आदिवासी समाजाचे आरक्षण अल्पसंख्यांकांच्या नावाखाली मुसलमानांना वाटू शकणार नाही, अशा कठोर शब्दांत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर तुफानी हल्ला चढविला.
PM Narendra Modi says Rajiv Gandhi scrapped inheritance law to save tax
महत्वाच्या बातम्या
- कर्मवीरांची रयत शिक्षण संस्था पवारांनी बळकावली; उदयनराजेंचा साताऱ्यातून थेट हल्लाबोल!!
- पवारांची मानभावी माफी त्यांच्यावरच उलटली; अमरावतीत शाह – फडणवीसांनी सादर केली पवारांच्या चुकांची यादी!!
- मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत ७ मे पर्यंत वाढ
- तुम्ही काँग्रेसला मतदान करा किंवा करू नका, निदान माझ्या अंतयात्रेला तरी या; कलबुर्गीच्या मतदारांवर मल्लिकार्जुन खर्गेंचा वैताग!!