वृत्तसंस्था
जयपूर : राजस्थान काँग्रेसमध्ये उघडपणे दोन शकले पडली असताना मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची स्तुती करत आणि काँग्रेसला चिमटे काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फुल्ल राजकीय बॅटिंग करून घेतली. राजस्थानला आज पंतप्रधानांनी पहिल्या वंदे भारत ट्रेनची भेट दिली. दिल्ली ते अजमेर अशी वंदे भारत ट्रेन धावणार आहे. तिचे उद्घाटन करताना पंतप्रधान मोदींनी जोरदार भाषण केले. या भाषणात त्यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची स्तुती केली. त्याचवेळी त्यांनी काँग्रेसला चिमटे काढून घेतले. PM Narendra modi praise ashok Gehlot admist rajasthan Congress Crisis
पंतप्रधान मोदी म्हणाले, मी अशोक गेहलोत यांचे आभार मानतो. कारण त्यांनी सध्याच्या राजकीय गदारोळात माझ्यासमोर राजस्थानच्या काही मागण्या मांडल्या आहेत. त्यांनी राजकीय संकटाच्या काळात विकास कामांसाठी वेळ काढला याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.
अर्थात जे कामे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच व्हायला हवी होती, ती कामे अशोक गेहलोत यांनी माझ्यापुढे मांडली आहेत. याचा अर्थ माझ्यावर त्यांनी जो विश्वास दाखवला आहे हीच त्यांची आणि माझी मैत्री असल्याचे द्योतक आहे. अशोक गेहलोत यांच्या हातात दोन्ही हातात लाडू आहेत. कारण रेल्वेमंत्री राजस्थानचे आहेत आणि रेल्वे बोर्डाचे चेअरमन देखील राजस्थानचे आहेत. त्यांच्याकडून त्यांना हवी तशी कामे करून घेता येतील. पण त्यांनी माझ्यावर भरवसा राखून माझ्याशी मैत्री निभावली आहे. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
गेहलोत – पायलट संघर्ष
राजस्थानात कालच सचिन पायलट यांनी अशोक गेहलोत यांच्या सरकारने वसुंधरा राजे सरकारमुळे झालेल्या भ्रष्टाचारा विरोधात काहीही कारवाई केली नाही. या मुद्द्यावर एक दिवसाचे उपोषण केले होते. एक प्रकारे अशोक गेहलोत यांच्याविरुद्ध ती बंडखोरी होती. त्यामुळे काँग्रेस गेहलोत आणि पायलट कॅम्पमध्ये विभागली आहे या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशोक गेहलोत यांची स्तुती करणे यामुळे काँग्रेसला मिरच्या झोंबल्या आहेत. इतकेच नाही तर जी कामे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच व्हायला हवी होती ती अजून झाली नाहीत आणि ती अशोक गेहलोत यांनी आपल्यासमोर मांडली, असे म्हणून देखील पंतप्रधानांनी काँग्रेसच्या सरकार यांना राजकीय चिमटा काढून घेतला आहे.
PM Narendra modi praise ashok Gehlot admist rajasthan Congress Crisis
महत्वाच्या बातम्या
- हेट स्पीचप्रकरणी राहुल गांधींची पाटणा कोर्टात हजेरी, सुशील मोदींनी दाखल केला होता खटला; सुरत कोर्टाकडून यापूर्वीच शिक्षा
- ट्विटरचे एक्स कॉर्पमध्ये विलीनीकरण होण्याची शक्यता, एलन मस्क यांचे सूचक ट्विट, 20 एप्रिलला हटणार ब्लू टिक
- लाऊडस्पीकरवर अजानला बंदी, आज जनहित याचिकेवर गुजरात हायकोर्टात सुनावणी; राज्य सरकार सादर करणार उत्तर
- वज्रमुठीची बोटे ढिल्ली पडल्यानंतर 82 वर्षाचा तरुण वज्रमुठ सभेला संबोधित करण्याची चर्चा!!