वृत्तसंस्था
नवी दिल्ली : 28 मे 2023 सावरकर जयंतीच्या दिवशी नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याआधीच चोल राजवंशीयांचे सत्तांतराचे प्रतीक असलेला पवित्र सेंगोल 20 अधिनम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपविला. पंतप्रधानांचे निवासस्थान 7 लोक कल्याण मार्ग येथे 20 अधिनम यांनी त्यांची भेट घेतली. या सर्वांनी पंतप्रधानांना आशीर्वाद दिले आणि पवित्र सेंगोल अर्थात राजदंड त्यांच्याकडे सुपूर्द केला. या छोटेखानी कार्यक्रमाला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी हे उपस्थित होते. PM Narendra Modi meets the Adheenams at his residence and takes their blessings. The Adheenams handover the Sengol to the Prime Minister
चोल राजवंशीयांचे प्रतीक असलेला हा पवित्र सेंगोल 14 ऑगस्ट 1947 या दिवशी सकाळी 11 वाजून 45 मिनिटांनी अधिनम यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे सोपविला होता. ते भारतीय परंपरेनुसार ब्रिटिशांकडून आरोग्यांकडे झालेल्या सत्तांतराचे प्रतिक होते. परंतु नंतर त्या सेंगोलची संभावना पंडित नेहरूंची सोनेरी वॉकिंग स्टिक या स्वरूपात करत त्याची रवानगी पंडित नेहरूंच्या खासगी भेटीच्या स्वरूपात अलाहाबादच्या आनंद भवन संग्रहालयात केली होती.
पण आता हा पवित्र संगोल उद्या नव्या संसद भवनातल्या लोकसभेच्या कक्षात सभापतींच्या आसनानजीक प्रतिष्ठापित करण्यात येणार आहे. त्याआधी 20 अधिनम आज पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेले आणि हा पवित्र सेंगोल अभिमंत्रित करून त्यांच्याकडे सुपूर्द केला.
PM Narendra Modi meets the Adheenams at his residence and takes their blessings. The Adheenams handover the Sengol to the Prime Minister
महत्वाच्या बातम्या
- नवीन संसद भवनात ‘एक भारत, सर्वोत्तम भारत’ची झलक; महाराष्ट्रातून सागवान, राजस्थानचे संगमरवर तर उत्तर प्रदेशातून कार्पेट!
- समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर दुसऱ्या टप्प्याचे शिंदे – फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण
- मोदी सरकारची 9 वर्षे : काँग्रेसचे 9 प्रश्न; सरकारचे 9 निर्णय!!
- सावरकर जयंती निमित्त फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वस्तीगृहातली खोली सामान्यांसाठी खुली..