• Download App
    PM Narendra Modi : प्रभू श्रीरामांसारखं मर्यादा पाळू ; पवित्र रमजानचं धैर्य आणि अनुशासनाचा अवलंब करू; अन् देशाला लॉकडाऊनपासून वाचवू ! PM Narendra Modi: Keep limits like Lord Shriram; Let’s adopt the patience and discipline of Holy Ramadan; Save Andesha from lockdown

    PM Narendra Modi : प्रभू श्रीरामांसारखं मर्यादा पाळू ; पवित्र रमजानचं धैर्य आणि अनुशासनाचा अवलंब करू; अन् देशाला लॉकडाऊनपासून वाचवू

    विशेष प्रतिनिधी 

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi live) यांनी देशाला संबोधित केलं. देशाला लॉकडाऊनपासून वाचवायचं आहे. त्यासाठी  सर्वांनी नियम पाळायला हवेत. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे, असं मोदी म्हणाले. प्रभू श्रीरामांसारखं मर्यादा पाळू ,पवित्र रमजानचं धैर्य आणि अनुशासनाचा अवलंब करू,अन् देशाला लॉकडाऊनपासून वाचवू असं भावनिक आवाहन केलं. अफवा आणि भिती संपवा.PM Narendra Modi: Keep limits like Lord Shriram; Let’s adopt the patience and discipline of Holy Ramadan; Save Andesha from lockdown

    करोना महामारीत देश मोठी लढाई लढत आहे. कोरोनाची दुसरी लाट तुफान बनून आली आहे. जो त्रास तुम्ही सहन केला, जो त्रास तुम्ही सहन करत आहात, त्याची मला पूर्ण कल्पना आहे. ज्यांनी आपल्या माणसांना गमावलं, त्यांच्याप्रती देशाकडून संवेदना.

    जनभागीदारीतून कोरोनाचं हे तुफान उधळून लावू. या संकटाच्या काळात देशवासियांनी पुढे यावं आणि गरजवंतांना मदत करा. समाजाचा पुरुषार्थ आणि सेवाभावनेतून ही लढाई जिंकू शकू, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

    ज्यांनी माणसं गमावले त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो

    “कोरोना विरोधात देश आज पुन्हा एक मोठी लढाई लढत आहे. काही आठवड्यांपूर्वी परिस्थिती सुधारली होती. मात्र, पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली. जे तुम्ही सोसत आहात त्याची मला पूर्ण जाणीव आहे. ज्या लोकांनी आपल्या माणसाला गमावलं त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. परिवाराचा एक सदस्य म्हणून मी तुमच्यासोबत आहे”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

    संकट मोठं आहे, पण विश्वासाने मात करायची आहे

    संकट मोठं आहे, पण आपल्याला हे संकट विश्वासाने पार करायचं आहे.  सर्व डॉक्टर, नर्स, मेडिकल स्टाफ, अॅम्ब्युलन्स ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक या सर्वांनी आपलं आयुष्य पणाला लावून जीव वाचवले. या लाटेतही त्यांनी आपली चिंता आपलं कुटुंब सोडून सेवा सुरुच ठेवली आहे.

     

    सर्वांना ऑक्सिजन पुरवण्याचे प्रयत्न सुरु

    आपल्या शास्त्रात म्हटलंय, कठीण पेक्षाही कठीण काळात आपल्याला धैर्य सोडायला नको, असं म्हटलं आहे. कोणत्या कठीण परिस्थितीत योग्य निर्णय घेतला तरच आपण यश प्राप्त करु शकतो. याच मंत्राला फॉलो करत देश पुढे जात आहे. कोरोना संकटात देशातील अनेक भागात ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. या विषयावर पूर्णपणे संवेदनशीलपणे काम केलं जात आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि प्रशासन यांचे सर्वांचे प्रत्येकाला ऑक्सिजन पुरवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

    तरुणांना विशेष आवाहन 

    “माझी तरुणांना विनंती आहे. त्यांनी आपल्या सोसायटी, परिसरात छोटी कमिटी बनवून कोव्हिड नियम लागू करण्यासाठी मदत करावी. आपण तसं केलं तर लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता लागणार नाही. स्वच्छता अभियानसाठी पाचवी ते दहावीच्या बालमित्रांनी खूप मदत केली होती. त्यांनी घरच्यांना आणि लोकांना स्वच्छतेचा संदेश दिला होता. आज त्यांना मी विनंती करतो, घरात असं वातावरण तयार करा की, घरातील लोक विनाकारण घराबाहेर पडू नये. प्रसारमाध्यामांनीही लोकांना सतर्क करण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न आणखी वाढवावे.

     

    PM Narendra Modi: Keep limits like Lord Shriram; Let’s adopt the patience and discipline of Holy Ramadan; Save Andesha from lockdown

     

    Related posts

    Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी

    UPI transactions : दोन हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर GST लादण्याची कोणतीही योजना नाही

    Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांनी बंगाल पोलिसांना म्हटले ‘मूक प्रेक्षक’