• Download App
    दीदी... ओ दीदी... आदरणीय दीदी... मोदी उचकवतायत... दीदी उचकताहेत | PM narendra modi in different political mood in west bengal

    दीदी… ओ दीदी… आदरणीय दीदी… मोदी उचकवतायत… दीदी उचकताहेत

    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता – बंगालच्या निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या भाषणातून वेगळेच रंग भरतात यात काही विशेष उरलेले नाही… पण मोदी सध्या वेगळ्याच मूडमध्ये दिसत आहेत. ते जाहीर सभांमध्ये ज्या पध्दतीने ममता बॅनर्जींना टार्गेट करताहेत ना… ते पाहून त्यांना ही निवडणूक वेगळ्याच दिशेला न्यायची आहे आणि ममता बॅनर्जींचा अहंकार अजून फुलवायचाय… त्यांना उत्तर देणे भाग पाडायचेय. आणि त्या उत्तरांमधून आपल्या जाळ्यात अडकवायचेय हेच स्पष्ट होत आहे… आणि त्याला अन्य कोणी नाही, स्वतः दीदीच रागवून, वेगवेगळी विचित्र वक्तव्ये करून त्यांच्या जाळ्यात अडकताना दिसत आहेत. मोदी बंगालमध्ये जेवढ्या सभांना संबोधित करताहेत… त्या प्रत्येक सभेत हेच चित्र मोठे होताना दिसत आहे. PM narendra modi in different political mood in west bengal

    हा खेळ बंगलाची जनताही आता समजू लागल्याचे दिसत आहे. कारण मोदी आपल्या भाषणात संवाद साधताना मध्येच दीदींना संबोधताता ना… तेव्हा प्रचंड गर्दीचा त्यांना हुंकाराचा प्रतिसाद मिळताना दिसतोय. मोदी जेव्हा नुसते दीदी… ओ दीदी असे म्हणायला सुरूवात करतात ना त्याचवेळी जनता कान टवकारून बसलेली दिसते की आता मोदी दीदींना कोणत्या पेचात टाकतात… त्यांना काय – काय म्हणतात… मग मोदी सुरू करतात…

    दीदी… ओ दीदी आपको गुस्सा क्यो आता है… आपका गुस्सा इसलिये है क्या की आपकी सिंडिकेट सरकार… टोलाबाजी सरकार जा रही है… दीदी, आपको जय श्रीराम नामसे गुस्सा आता है क्या… आपको दुर्गापूजासे गुस्सा है क्या… त्यावेळी जनतेचा हुंकार मोठा होत जातो… मोदी आपल्या भाषणात वारंवार दीदी ओ दीदी, आदरणीय दीदी असे संबोधतात आणि त्यांना उचकवत राहतात आणि जनता त्यांना हुंकाराचा प्रतिसाद देत राहते.



    मोदी म्हणतात, की दीदींनी लोकांचा विश्वासघात केला. बंगाली युवकांना बेरोजगारी दिली आहे. दीदींना सारखे मुस्लिमांना अपील करावे लागत आहे. पण बंगाली बहिणी, बेटींवर अत्याचार झाले. दीदी तुम्ही चूप बसलात. मुस्लीम बहिणी – बेटींनी दीदींवर विश्वास ठेवला. भाजपने तीन तलाक विरोधात कायदा केला पण दीदींनी त्यांची साथ सोडली पण दीदींनी कट्टरपंथीयांची साथ दिली. त्यावेळी जनता त्यांच्या प्रत्येक वाक्याला हुंकारांनी प्रतिसाद देताना दिसते.

    मग मोदी प्रचंड गर्दीकडून हिंसाचार खेला शेष होबे… कटमनी खेला शेष होबे… टोलार बाजीर खेला शेष होबे… सिंडिकेटेड खेला शेष होबे… टीएमसीर खेला शेष होबे… दीदी… ओ दीदी… खेला शेष होबे, हे नारे देऊन त्यांच्याकडूनच आपल्या ए बार कमलछापचा घोष करून घेतात. असोल पोरिबर्तनची घोषणा करून घेतात… दीदी त्यांच्या जाळ्यात अडकतात आणि त्यांना उत्तरे देत बसतात. आणि अधिकाधिक रागवत राहतात… आणि इथेच मोदी यशस्वी होताना दिसतात.

    PM narendra modi in different political mood in west bengal


    हे ही वाचा

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!