विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातला तणाव, भारताने सुरू केलेले operation Sindoor या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक घेतली. त्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सर्वपक्षीय नेत्यांना आवश्यक ती माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित नव्हते. मात्र, त्याच वेळी पंतप्रधान मोदींनी आपल्या निवासस्थानी केंद्र सरकार मधल्या सर्व महत्त्वाच्या खात्यांच्या सचिवांची बैठक घेतली. या बैठकीला संरक्षण, गृह, अर्थ, आरोग्य, ऊर्जा, नागरी पुरवठा, माहिती प्रसारण आदी खात्यांचे सचिव उपस्थित होते. या सर्वांनी पंतप्रधानांना सर्व खात्यांमधली first hand information दिली. या बैठकीत पंतप्रधानांचे मुख्य सचिव आणि कॅबिनेट सेक्रेटरी हजर होते. परंतु एकही मंत्री पंतप्रधानांनी घेतलेल्या बैठकीला हजर नव्हता.PM Narendra Modi holds meeting
संरक्षण दृष्ट्या अत्यंत नाजूक अशा परिस्थितीमध्ये सर्व महत्त्वाचे मंत्री अन्य बैठकांमध्ये गुंतले असताना स्वतः पंतप्रधानांनी वेगवेगळ्या खात्यांच्या सचिवांची स्वतंत्र बैठक पहिल्यांदाच घेतली.
सर्वपक्षीय बैठकीचे नेतृत्व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. त्या बैठकीला गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, कायदेमंत्री किरण रिजिजू, चिराग पासवान, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, राम गोपाल यादव आणि अन्य वेगवेगळ्या पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. त्याचवेळी पंतप्रधानांनी सचिवांची बैठक घेतली.
पंतप्रधानांनी घेतलेल्या बैठकीत सर्व सचिवांनी आपापल्या खात्यांचा आढावा सादर केला. घेतला. पंतप्रधानांनी सर्वांना अनेक महत्त्वपूर्ण सूचना केल्या. सध्याच्या अत्यंत नाजूक परिस्थितीमध्ये विविध मंत्रालयांमधल्या समन्वयाची यंत्रणा मजबूत करायला सांगितले. कुठल्याही गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपल्या मंत्रालयांमध्ये सर्व यंत्रणा हाय अलर्ट मोडवर ठेवण्याची सूचना केली. देशाची आणि भारतीय नागरिकांची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. त्या दृष्टीनेच सर्व खात्यांमधून कामकाज चालले पाहिजे, ही महत्त्वाची बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केली. ऑपरेशन सिंदूर संपले नसल्याची ग्वाही दिली.
PM Narendra Modi holds meeting with top officials, in Delhi
महत्वाच्या बातम्या
- Mock drill महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये मॉक ड्रिल ; सायरन वाजणार, ब्लॅकआउट असणार
- अहिल्यानगरमध्ये पोलीस वसाहत अन् प्रशासकीय इमारतीच्या विकासासाठी 102 कोटींचा प्रकल्प
- पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानात घुसून 9 ठिकाणांवर भारताचे मिसाईल हल्ले; Operation sindoor ही तर सुरुवात, अजून बरेच काही बाकी!!
- Operation sindoor : जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा यांच्या म्होरक्यांना मारण्यासाठीच पाकिस्तानात 9 ठिकाणांवर भारताचा मिसाईल हल्ले!!