• Download App
    पंतप्रधान मोदींच्या फटकेबाजीवर शशी थरूर खुश, पण... pm narendra modi gave a good speech but didnt give any answers to our questions, says shashi tharoor

    पंतप्रधान मोदींच्या फटकेबाजीवर शशी थरूर खुश, पण…

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत केलेल्या फटकेबाजीवर काँग्रेसचे खासदार शशी थरूर खुश तर झाले, पण म्हणाले, त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरे नाही दिली. pm narendra modi gave a good speech but didnt give any answers to our questions, says shashi tharoor

    पंतप्रधानांचे लोकसभेतले आजचे राष्ट्रपतींच्या भाषणावरील आभार प्रस्तावावरील उत्तराचे भाषण नेहमीरप्रमाणे तुफान फटकेबाजीने गाजले. काँग्रेस खासदार राहुल गांधींनी अदानी – हिंडेनबर्ग प्रकरणात मोदींचे नाव घेऊन मोदींना लोकसभेत प्रत्युत्तर देण्याची आयती संधी दिलीच होती. तिचा मोदींनी पुरेपुर लाभ घेतला. काँग्रेस आणि विरोधकांवर तुफानी हल्ला चढविला.

    देशाची प्रगती काहीजणांना बघवत नाही. त्यांच्यात अहंकार एवढा भरला आहे, की आपल्याशिवाय या देशाचा भाग्योदय कोणी करूच शकत नाही, असे त्यांना वाटते. पण देशातल्या १४० कोटी जनतेच्या मेहनतीने देश प्रगती करतो आहे हे पाहून ते निराशेच्या गर्तेत बुडले आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि काँग्रेससह सर्व विरोधकांवर हल्लाबोल केला.

    त्यांनी हार्वडच्या उच्चशिक्षितांनाही ख़डे बोल सुनावले. भारताच्या अपयशाच्या अभ्यास करायला निघालेल्या हार्वडमध्ये काँग्रेसच्या उदयास्ताचा अभ्यास सुरू असल्याचा टोला त्यांनी काँग्रेसमधल्या उच्चशिक्षितांना हाणला.

    त्यामुळे त्यांचे भाषण राहुल गांधी आणि शशी थरूर यांना टोचले. शशी थरूर म्हणाले, पंतप्रधान मोंदींनी भाषण चांगले केले. पण विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना त्यांनी उत्तरे दिली नाहीत. राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या भाषणाला निराशाजनक असे लेबल लावले.

    -आपले शब्द संसदेच्या कामकाजातून वगळल्याचा राहुल गांधींचा दावा

    राहुल गांधी यांनी अदानी – हिंडेनबर्ग मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांची थेट नावे घेऊन हल्लाबोल केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या आरोपांना प्रत्युत्तर देखील दिले आहे.

    मात्र, राहुल गांधी आपले आरोप आणि शब्द संसदेच्या कामकाजातून वगळल्याचा दावा केला आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाच्या चर्चेला लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देत असताना राहुल गांधी हे संसदेत प्रवेशकर्ते झाले, त्यावेळी संसदेच्या पायऱ्यांवरूनच त्यांनी आपले शब्द संसदेच्या कामकाजातून वगळल्याचा दावा केला. माझे शब्द का वगळले, असा सवाल पत्रकारांना करून ते लोकसभेत प्रवेशकर्ते झाले.

    pm narendra modi gave a good speech but didnt give any answers to our questions, says shashi tharoor

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य