भोपाळ ते दिल्ली या मार्गावर धावरणार देशातील अकरावी वंदे भारत ट्रेन
विशेष प्रतिनिधी
भोपाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी भोपाळच्या राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून भोपाळ ते दिल्ली या देशातील अकराव्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. मध्य प्रदेशातील ही पहिली वंदे भारत ट्रेन आहे. पंतप्रधान मोदी आज सकाळच्या सुमारास हवाई दलाच्या विशेष विमानाने भोपाळला पोहोचले होते. राज्यपाल आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्यांचे येथे स्वागत केले. PM Narendra Modi flags off Bhopal New Delhi Vande Bharat train at Rani Kamlapati railway station
GST संकलनात मार्चमध्ये १३ टक्के वाढ, आत्तापर्यंतचे दुसरे सर्वोच्च कर संकलन
पीएम मोदी म्हणाले, पूर्वी खासदार पत्र लिहायचे की या स्थानकावर ट्रेन थांबावी, इथे थांबा, तिथे थांबावी.. हीच पत्राद्वारे मागणी केली जायची. परंतु आज मला अभिमान वाटतो की जेव्हा खासदार पत्रं लिहितात आणि मागणी करतात की ‘वंदे भारत ट्रेन’ आमच्याकडेही लवकरात लवकर सुरू करावी.
याशिवाय, ‘’आज रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जात आहे. आज देशातील सहा हजार स्थानकांवर वायफाय सुविधा दिली जात आहे. देशातील ९०० हून अधिक रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे.’’ अशी ही माहिती मोदींनी यावेळी दिली. तसेच, ”२०१४मध्ये तुम्ही मला सेवेची संधी दिली होती, तेव्हा मी ठरवले होते की आता असे होणार नाही, रेल्वेला नवसंजीवनी देऊ, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. गेल्या ९ वर्षांत, भारतीय रेल्वेला जगातील सर्वोत्तम रेल्वे नेटवर्क बनवण्याचा आमचा सतत प्रयत्न होता.”
PM Narendra Modi flags off Bhopal New Delhi Vande Bharat train at Rani Kamlapati railway station
महत्वाच्या बातम्या
- नवीन आर्थिक वर्षात ग्राहकांना सुखद धक्का, व्यायसायिक एलपीजी सिलिंडर 92रुपयांनी स्वस्त
- नाशिकमधले नवे वेदोक्त प्रकरण; सामाजिक वादाच्या ठिणगीला फुंकर आणि सावरकर गौरव यात्रेला काटशह देण्याचा हेतू?
- मोदी सरकारची सर्वसामान्यांना मोठी भेट, आता अल्पबचत योजनेवर मिळणार अधिक व्याज!
- बिहार : सासारामनंतर नालंदामध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत हिंसाचार; गोळीबारात तीन जण जखमी