प्रतिनिधी
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी ११ डिसेंबर रोजी नागपुरमध्ये समृद्धी महामार्गासह मेट्रो फेज-१ च्या उर्वरित मार्गांचे उद्घाटन करण्यासाठी येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बर्डी परिसरातील झिरो माईल स्टेशन ते खापरी स्टेशन दरम्यान मेट्रोने प्रवास करणार आहेत. मेट्रोतील विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली. PM Modi’s visit to Nagpur; Inauguration of transport corridor with metro travel
नागपुरात आल्यावर पंतप्रधान सर्वात आधी अजनी रेल्वे स्टेशनवरील कार्यक्रमास जाणार आहे. तिथून ते मेट्रोने प्रवास करणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान खापरी येथून समृद्धी महामार्गावर जाणार आहेत. याठिकाणी टेस्ट ड्राइव्ह करत ते परत एम्स परिसरात होणाऱ्या मुख्य कार्यक्रम सोहळ्यास येतील. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते कस्तूरचंद पार्क ते ऑटोमोटिव्ह चौक (रीच 2) आणि झाशी राणी चौक ते प्रजापती नगर (रीच-3) या मेट्रो मार्गाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. चार-स्तरीय वाहतूक कॉरिडॉरचे उद्घाटन हे एक प्रमुख आकर्षण ठरणार असून ते जमिनीपासून २८ मीटर उंचीवर थेट रेल्वे ट्रॅक ओलांडून 18.9M रुंद स्टील गर्डरमधून तयार झाले आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्यात नागपूर तसेच अजनी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचा कार्यक्रमही जोडण्यात आल्याची माहिती आहे. तसेच पंतप्रधानांच्या नागपूर दौऱ्यात नागपूरकरांना एक ‘वंदे भारत एक्सप्रेस’ मिळण्याची ही शक्यता आहे. पंतप्रधानांच्या नागपूर दौऱ्यावरून महामेट्रो प्रशासनात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. वर्धा मार्गावरील गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या डबर डेकर पुलाचे डांबरीकरण, येथील दुभाजकांवर लावलेल्या झाडांची कापणी आदी कामे करण्यात येत आहे. वर्धा मार्गावरील ट्रॅक, स्टेशनची स्वच्छता आदी करण्यात येत आहे.
PM Modi’s visit to Nagpur; Inauguration of transport corridor with metro travel
महत्वाच्या बातम्या
- Gujrat Elections Result 2022 : गुजरातेत 2017 मध्ये डिस्टिंक्शन मिळवणारी काँग्रेस 2022 मध्ये काठावर पास व्हायला धडपडतीये
- हरियाणाची पुनरावृत्ती हिमाचलात : हिमाचलमध्ये पॉवर गेमचे मोहरे खेळवायला विनोद तावडे शिमल्यात
- गुजरात मध्ये केजरीवालांचे लिख लो चॅलेंज फेल; पण नरेंद्र का रेकॉर्ड भूपेंद्र तोडेगा यशस्वी होताना दिसतेय!
- हिमाचल मधून काँग्रेस साठी आनंदाची बातमी; राहुलजी प्रचारात नसतील तरी संघटनेचे बळ येते कामी!!