वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जगभरातील टॉपच्या ऑइल आणि गॅस कंपन्यांच्या मुख्य अधिकाऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.PM Modi’s talks with CEOs of top oil and gas companies Petrol Diesel Stop gas price hike
आज झालेल्या चर्चेनंतर पेट्रोल, डिझेल तसेच स्वयंपाकाचा गॅस यांचे भाव कमी होणार का? दरवाढ कमी करून मोदी सरकार सर्वसामान्यांना दिलासा देणार का?, याची चर्चा सुरू झाली आहे.
देशभरात गॅस आणि पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात अनेक राजकीय पक्षांनी आंदोलने केली. सर्वसामान्य जनता देखील आता या दरवाढीच्या विरोधात उघडपणे बोलू लागली आहे.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑइल आणि गॅस कंपन्यांच्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याने त्याचा परिणाम म्हणून पेट्रोल डिझेल आणि गॅस यांची दरवाढ कमी करून मोदी सरकार सर्वसामान्यांना दिलासा देईल का?, हा प्रश्न विचारला जात आहे.
आजच्या ऑनलाईन चर्चेत मुकेश अंबानी यांच्यासह रशियाच्या रॉसनेफ्ट कंपनीचे चेअरमन इग्नोर सँचिन, सौदी अरमको कंपनीचे चेअरमन अमीन नासिर आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
PM Modi’s talks with CEOs of top oil and gas companies Petrol Diesel Stop gas price hike
महत्त्वाच्या बातम्या
- एनसीबीच्या समीर वानखेडे यांचे कॉल रेकॉर्डिंग रिलीज झाल्यास सर्व केस बनावट आहे हे लक्षात येईल : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, पुढील आठवड्यात सर्व पुरावे देणार
- ‘सध्याच्या मुख्यमंत्र्यांकडे कोणतेही काम नाही, शरद पवारच मुख्यमंत्र्याचे काम करतात’, केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची टीका
- शाहरुख खानची बायजूची जहिरात पुन्हा सुरू, आर्यनच्या ड्रग्ज प्रकरणामुळे एड्युटेक कंपनीने केली होती बंद
- फक्त उत्तर प्रदेशातच महिलांसाठी 40 टक्के जागा का, इतर राज्यांत महिला नाहीत?’ मायावतींचा काँग्रेसवर निशाणा
- …तर नारायण राणेंची कुंडली बाहेर काढू , विनायक राऊत यांचा इशारा