• Download App
    PM Modi's speech PM Modi च्या भाषणात no between the lines

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    PM Modi's speech

    नाशिक : पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!, अशा परखड शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पाकिस्तान आणि जागतिक समुदायाला गंभीर इशारा दिला. ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेनंतर पहिल्यांदाच केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी between the lines वाचण्यासारखे काही शिल्लकच ठेवले नाही. जे काही बोलायचे ते थेट आणि उघड बोलून ते मोकळे झाले. त्यामुळे मोदींनी अमेरिकेने “व्यापाराचे हत्यार” वापरून भारत आणि अमेरिका यांचे अणुयुद्ध थांबविले, हा डोनाल्ड ट्रम्प यांनी set करत आणलेला narrative उद्ध्वस्त केला.PM Modi’s speech

    ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेनंतर अचानक झालेल्या शस्त्रसंधी बाबत भारतात आणि भारताबाहेर अनेकांनी शंका उपस्थित केल्या होत्या. काँग्रेसने तर दुतोंडी भूमिका घेऊन भारतीय जवानांची पाठ थोपटली, पण ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेवर शंकेची मोहर उमटवली. संरक्षणासारख्या अतिसंवेदनशील मुद्द्यावर संसदेमध्ये जाहीर चर्चा करायची मागणी केली. भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय वाटाघाटी करायचे ठरले असताना त्रिपक्षीय वाटाघाटी कशा होतील??, असा सवाल उपस्थित केला होता. या सगळ्या सवालांची उत्तरे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट शब्दांमध्ये देऊन काँग्रेसचे तोंड गप्प केले. पण त्या पलीकडे जाऊन पाकिस्तान आणि दहशतवाद यांना आम्ही वेगवेगळे मानतच नाही. व्यापार आणि दहशतवाद, रक्त आणि पाणी, दहशतवाद आणि चर्चा एकत्र चालूच देणार नाही, असा स्पष्ट इशारा देऊन अमेरिकेच्या “तिसऱ्या पक्षाचे” तोंड गप्प केले.



    व्यापाराचीच भाषा करायची, तर मोदींनी “मेड इन इंडिया” शस्त्रांच्या व्यापाराची आपण सगळ्या जगाला देऊन टाकली. ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानने चिनी आणि तुर्की बनावटीची हत्यारे वापरली होती. भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमने ती सगळी हत्यारे नेस्तनाबूत केली. त्यामुळे इथून पुढे जगात मेड इन इंडिया शस्त्रांचाच बोलबाला चालेल असे पंतप्रधान मोदी जाहीरपणे म्हणाले. यातून त्यांनी “मेड इन इंडिया” शास्त्रांची जागतिक पातळीवर जाहिरात करून टाकली.

    अमेरिकेने व्यापाराचे हत्यार वापरून भारत आणि पाकिस्तान यांच्यातले अणुयुद्ध थांबविले. लाखो लोकांचे प्राण वाचविले, अशा डिंग्या डोनाल्ड ट्रम्प यांनी मारल्या होत्या. पण मोदींनी पाकिस्तानच्या छातीवर भारताने वार केल्याचे सांगून ऑपरेशन सिंदूर मध्ये भारताने नेमके पाकिस्तानला कुठे ठोकून काढले हे अप्रत्यक्षपणे सांगितले. त्याचबरोबर nuclear blackmail इथून पुढे चालणार नाही, असेही स्पष्ट केले. हा पाकिस्तान बरोबर अमेरिकेला आणि चीनलाही इशारा होता.

    पाकिस्तानच्या unity आणि integrity साठी आम्ही पाकिस्तान बरोबर आहोत अशा डिंग्या चीनने मारल्या होत्या. पण पाकिस्तान बरोबर चर्चा व्हायचीच असेल, तर पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात परत घेण्यासाठीच होईल, असे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट करून पाकिस्तानच्या unity आणि integrity चा चिनी दावा खोडून काढला.

    – पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले :

    – Trade आणि terrorism एकत्र चालणार नाहीत. आम्ही व्यापार आणि दहशतवाद, पाणी आणि रक्त, दहशतवाद आणि चर्चा एकत्र चालवू देणार नाही. देणार नाही.

    – ऑपरेशन सिंदूर दरम्यान संपूर्ण जगाने “मेड इन इंडिया” शस्त्रांची अचूक स्मारक क्षमता अनुभवली. इथून पुढे मेड इन इंडिया शस्त्रांचीच जागतिक पातळीवर चलती असेल.

    – ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तान बरोबरच्या संबंधांमध्ये न्यू नॉर्मल मापदंड सेट केले. पाकिस्तानच्या छातीवर प्रहार केला. भारताने दहशतवादाविरुद्ध युद्ध छेडले होते, पण पाकिस्तानने दहशतवादाला थारा देऊन ते युद्ध आपल्यावर उडवून घेतले.

    – इथून पुढे भारत दहशतवादी आणि दहशतवाद्यांचे आका यांना वेगळी मानणार नाही. भारताने पाकिस्तान विरुद्ध आणि दहशतवादाविरुद्धची लष्करी कारवाई सध्या स्थगित केली आहे पण पाकिस्तानची वर्तणूक तपासूनच यापुढे त्या देशाशी व्यवहार केला जाईल. पाकिस्तानने दहशतवाद पोसलाच, तर पाकिस्तानात कुठेही घुसून त्याला संपविले जाईल हे भारताचे आता इथून पुढचे धोरण असेल.

    – सिंधू जल करार स्थगितच राहील. कारण रक्त आणि पाणी एकत्र वाहू देणार नाही. चर्चा आणि दहशतवाद आम्ही एकत्र चालू देणार नाही. दहशतवादाबरोबर व्यापार एकत्र चालू देणार नाही.

    – पाकिस्तानशी चर्चा करायचीच तर दहशतवाद संपविण्यासाठी आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर भारताला परत घेण्यासाठीच होईल. अन्य विषयांवर चर्चा होणार नाही.

    – पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणातून पाकिस्तानला उद्देशून गंभीर इशारे दिले असले तरी अमेरिकेने मध्यस्थी केल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातले अणुयुद्ध थांबले, हा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा देखील अप्रत्यक्षपणे फेटाळून लावला.

    PM Modi’s speech: no between the lines; Pakistan’s chest has been attacked, only justice for Pakistan-terrorists and nuclear blackmail bye bye!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट

    Virat Kohli : विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट