• Download App
    मणिपूरमध्ये दोन महिलांबाबत घडलेल्या ‘त्या’ अत्यंत संतापजनक प्रकारावर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया, म्हणाले... PM Modis reaction on the shocking incident of two women in Manipur

    मणिपूरमध्ये दोन महिलांबाबत घडलेल्या ‘त्या’ अत्यंत संतापजनक प्रकारावर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया, म्हणाले…

    या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे.

    विशेष प्रतिनिधी

     इंफाळ : मणिपूरमध्ये कुकी समाजाच्या दोन महिलांची रस्त्यावर नग्नावस्थेत धिंड काढल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मणिपूरची राजधानी इंफाळपासून 35 किमी अंतरावर असलेल्या कांगपोकपी जिल्ह्यात 4 मे रोजी ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. PM Modis reaction on the shocking incident of two women in Manipur

    संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमधील या घटनेचा संदर्भ देत म्हटले की, ‘’’मणिपूरमध्ये जी घटना समोर आली आहे ती कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी लाजिरवाणी घटना आहे. दोषी किती आणि कोण,  ते आपल्या जागेवर आहे. मात्र अशा घाणेरड्या घटनेने संपूर्ण देशाचा अपमान होत आहे. या घटनेमुळे 140 कोटी भारतीयांना लाज वाटली. या लाजिरवाण्या घटनेबद्दल माझे हृदय आज वेदना आणि संतापाने भरून आले आहे.’’ अशा शब्दांमधे मोदींनी संताप व्यक्त  केला आहे.

    याचबरोबर मोदी म्हणाले की, ‘मी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना राज्याची कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याचे आवाहन करतो. आमच्या माता भगिनींच्या रक्षणासाठी कठोर पावले उचला. भारतात कायदा आणि सुव्यवस्थेला प्राधान्य द्यायला हवे आणि राजकीय वादविवादांवरून उठून माता-भगिनींचा सन्मान करायला हवा. मणिपूरच्या मुलींच्या बाबतीत जे घडले ते कधीही माफ केले जाऊ शकत नाही. कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही.’’

    PM Modis reaction on the shocking incident of two women in Manipur

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज

    China : चीन म्हणाला- आम्ही पाकिस्तानसोबत; PAKचा दावा- सैन्याने पेशावरमध्ये भारतीय ड्रोन पाडला