विशेष प्रतिनिधी
वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज वाराणसीतून आपला लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल केला. 25 NDA नेत्यांच्या उपस्थितीत मोदींनी वाराणसी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन हा अर्ज दाखल केला. हा अर्ज दाखल करताना त्यांनी राम मंदिरातील बालक रामांच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त काढून देणारे गणेश्वर शास्त्री दीक्षित यांना बरोबर घेतले होते. मोदींचे प्रमुख प्रस्तावक आहेत. त्यांना आपल्या शेजारी बसवून पंतप्रधान मोदींनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. PM Modi’s nomination form from Varanasi witnessed by 25 NDA leaders
पंतप्रधान मोदींसमवेत यावेळी त्यांचे अन्य तीन प्रस्तावक देखील हजर होते. यामध्ये जनसंघापासूनचे जुने कार्यकर्ते वैजनाथ पटेल, लालचंद कुशवाह आणि वाराणसी जिल्हा भाजप महामंत्री संजय सोनकर यांचा समावेश होता.
पंतप्रधान मोदींनी 2019 मध्ये देखील NDA नेत्यांच्या साक्षीनेच उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यावेळी त्यांच्या समवेत उद्धव ठाकरे होते. यावेळी त्यांच्या ऐवजी एकनाथ शिंदे हे मोदींच्या बरोबर होते. NDA च्या 25 नेत्यांमध्ये भाजपचे सर्व वरिष्ठ नेते पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे होतेच, त्याचबरोबर एकनाथ शिंदे, अंबूमणी रामदास, रामदास आठवले, जी. के. वासन, पशुपती पारस, जयंत चौधरी, ओमप्रकाश राजभर, प्रफुल्ल पटेल आदी घटक पक्षांचे नेते देखील उपस्थित होते.
वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मोदींनी दशाश्वमेध घाटावर जाऊन गंगा पूजन आणि आरती केली. त्यानंतर ते वाराणसीचा कोतवाल कालभैरवनाथाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेते झाले. त्यानंतरच त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी, मोदींनी कालच सायंकाळी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन विश्वनाथाची पूजा केली होती. काल गंगा आरती मध्ये देखील ते सहभागी झाले होते.
PM Modi’s nomination form from Varanasi witnessed by 25 NDA leaders
महत्वाच्या बातम्या
- फोडाफोडीच्या राजकारणावरून आज बोंबाबोंब, पण त्या राजकारणाचे तर शरद पवारच जनक!!
- पश्चिम बंगालमधील संदेशखळीमध्ये पुन्हा तणावाचे वातावरण!
- Alamgir Alam ED Summons : काँग्रेस नेते आलमगीर आलम यांना ‘ED’ने बजावले समन्स!
- अदानी + अंबानींविरोधात राहुल गांधींचा कंठशोष; पण पैसे दिल्यास काँग्रेस नेते मूग गिळून गप!!