• Download App
    ‘सिटी ऑफ जॉय'चे अर्थात कोलकत्याचे ‘सिटी ऑफ फ्युचर'मध्ये रूपांतर करू - मोदी|PM Modiji lashes On didi

    ‘सिटी ऑफ जॉय’चे अर्थात कोलकत्याचे ‘सिटी ऑफ फ्युचर’मध्ये रूपांतर करू – मोदी

    विशेष प्रतिनिधी

    कोलकता : राज्यात भाजपचे नवे सरकार तंत्रज्ञानाचा वापर करून ‘सिटी ऑफ जॉय’चे अर्थात कोलकात्याचे ‘सिटी ऑफ फ्युचर’मध्ये रूपांतर करेल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन प्रचारसभेत दिले.PM Modiji lashes On didi

    मुळ कार्यक्रमानुसार मोदी शुक्रवारी चार सभा घेणार होते, पण निवडणूक आयोगाने बंधने घातल्यामुळे त्यांना केवळ एक ऑनलाइन’ सभा घेता आली. मोदी म्हणाले की, पश्चिम बंगाल सरकार बांगलादेशमधील अवैध स्थलांतरितांना आश्रय देत आहे.



    खंडणी उकळणाऱ्या टोळ्यांनाही रान मोकळे सोडण्यात आले आहे. संघटित गुन्हेही घडत आहेत. हे तीन गैरप्रकारच बंगालच्या विकासामधील अडथळे ठरले आहेत.

    मोदी यांनी याप्रसंगी श्रमाची प्रतिष्ठा, उपजीविकेची सुकर संधी, उद्योगधंद्यांना पोषक वातावरण अशा मुद्द्यांचे महत्त्व अधोरेखित केले. या गोष्टींचा बंगालमध्ये अभाव असल्याचा दावा करून ते म्हणाले की, बंगाल शांतता, सुरक्षा आणि विकासाची उत्कंठेने प्रतिक्षा करतो आहे.भाजप सरकार सत्तेवर येण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी दिले.

    PM Modiji lashes On didi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!

    Bihar : बिहारमध्ये NDAचे जागावाटप- जेडीयू 102, भाजप 101 जागा लढवणार