विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद – भूमातेला वाचविण्यासाठी नैसर्गिक तंत्राचा स्वीकार करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातेतील शेतकऱ्यांना केले. मा उमिया मंदिराच्या तीन दिवसीय पायाभरणी समारंभाच्या समारोपच्या कार्यक्रमात मोदी यांनी व्हिडिओद्वारे संदेश दिला.PM Modiji bats for natural farming
ते पुढे म्हणाले, की नैसर्गिक शेतीचा अर्थ झिरो बजेट शेती असाही होतो. आपल्या शेतातील ठाराविक भाग नैसर्गिक शेतीसाठी राखून ठेऊन किंवा एका वर्षाआड नैसर्गिक शेती करावी. यामुळे, खर्चात बचत होईल.
शिवाय बदल घडून भूमातेमध्ये एक नवीन चेतना निर्माण होईल. यातून भावी पिढ्यांसाठीही चांगले काम होईल.मा उमिया उत्तर गुजरातेतील कडवा पाटीदार शेतकरी समाजाची कुलदेवता आहे..
पंतप्रधान शेतकऱ्यांना उद्देशून केलेल्या भाषणात म्हणाले, की अधिक उत्पादनाच्या इच्छेने शेतकऱ्यांना भूमातेची कसलीही पर्वा न करता खते, कीटकनाशकांचा वापर करण्यास भाग पाडले. त्यामुळे, मातीचा दर्जा खालावला., उत्तर गुजरातला नैसर्गिक शेतीत पुढे नेण्याची प्रतिज्ञा मा उमियापुढे घेण्याची विनंती मी तुम्हाला करत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
PM Modiji bats for natural farming
महत्त्वाच्या बातम्या
- राहूल गांधी हिंदू असतील तर त्यांनी मोगलांनी हिंदू मंदिरांवर केलेल्या आक्रमणाचा निषेध करावा, चंद्रकांत पाटील यांचे आव्हान
- रुग्णवाहिका चालकाला लागला जॅकपॉट, २७० रुपयांच्या तिकिटावर जिंकले एक कोटी रुपयाचे बक्षीस
- धर्माच्या आधारावर फाळणी ही ऐतिहासिक चूक, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन
- काशी विश्वनाथ कॉरिडाॅर प्रमाणेच कोलकात्याचा कालीघाट ममतांनी विकसित करावा; भाजपची मागणी
- राहुल गांधींच्या मुंबईतील रॅलीसाठी काँग्रेसची आपल्याच महाविकास आघाडी सरकार विरोधात हायकोर्टात धाव!!