नाशिक : विरोधक नुसतीच करत राहिले रिटायरमेंटची चर्चा; पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांना नव्या संकल्पासह दिल्या 75 च्या शुभेच्छा!!, असे राजकीय चित्र आज 11 सप्टेंबर 2025 रोजी दिसले. विशेष लेख लिहून सरसंघचालकांना शुभेच्छा देणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले. PM Modi
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी 2025 मध्ये 75 वर्षांचे झाले आणि होणार ज्यामुळे ते रिटायरमेंटच्या दिशेने जाणार, अशा अटकळी विरोधकांनी बांधल्या होत्या. दोघांच्या रिटायरमेंट वर सगळ्या विरोधी पक्षांमध्ये जोरदार चर्चा रंगविल्या होत्या. विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांना रिटायरमेंटची चर्चा घडवून टोचले देखील होते. तुम्हीच लालकृष्ण अडवाणी आणि डॉ. मुरली मनोहर जोशी यांना 75 आकडा दाखवून रिटायर्ड केलेत. आता तुम्ही 75 वर्षांचे झालात म्हणजे तुम्ही पण रिटायर झाले पाहिजे, अशा पद्धतीचा युक्तिवाद सगळ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केला. पण यामध्ये आपण मोदी + भागवतांचा पराभव करू शकलो नाही याची अप्रत्यक्ष खंत दडली होती, फक्त ती त्यांनी उघडपणे दाखवली नव्हती. त्या उलट ते मोदींच्या आणि भागवतांच्या रिटायरमेंटचे ढोल + ताशे मात्र वाजवत राहिले.
लेख लिहून मोदींच्या भागवतांना शुभेच्छा
प्रत्यक्षात मोदी भागवतांच्या रिटायरमेंटचे विरोधकांचे स्वप्न आज भंगले. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारताच्या नव्या संकल्पसह मोहन भागवत यांना 75 च्या शुभेच्छा दिल्या. मोदींनी भागवतांच्या 75 निमित्त दीर्घ लेख लिहिला. त्यामध्ये भागवतांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये उलगडून दाखविली. आपले आणि भागवतांचे संबंध किती जुने आणि किती दृढ आहेत, याचे सविस्तर वर्णन केले. त्याचवेळी भारत आत्मनिर्भरतीच्या दिशेने वाटचाल करताना मोहन भागवतांचे मार्गदर्शन किती मोलाचे ठरले, याविषयी देखील कृतज्ञता व्यक्त केली. राष्ट्र प्रथम या संकल्प भावातून मोहन भागवतांनी जीवनभर संघ कार्य केले. त्यांच्या कार्यातून देशभरातल्या लाखो युवकांना प्रेरणा मिळाली. भागवतांच्या प्रेरणेतून या युवकांनी विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वाची कामगिरी केली, याची आठवण यानिमित्ताने मोदींनी करून दिली.
रिटायरमेंटची चर्चा गुंडाळली
मोदींचा हा लेख सगळ्या माध्यमांमधून गाजला. या लेखाद्वारेच मोदींनी आत्मनिर्भर भारताच्या दमदार वाटचालीचा संकल्प केला. पण त्यापलीकडे जाऊन या एकाच लेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रिटायरमेंटची अख्खी चर्चाच गुंडाळून टाकली. विरोधकांनी मोदी आणि भागवतांच्या रिटायरमेंटची चर्चा साधारण वर्षभर चालविली, ती मोदींनी एका लेखातून गुंडाळून टाकली.
PM Modi writes special article, praise RSS chief Mohan Bhagwat
महत्वाच्या बातम्या
- EU ने भारतावर टेरिफ लादण्यासाठी ट्रम्प प्रशासनाची धमकी; पण मोदींची चर्चा इटलीच्या पंतप्रधानांशी!!
- उद्धव ठाकरे “फक्त” कुंदा मावशींना भेटायला शिवतीर्थावर; अडीच तासांच्या चर्चेत म्हणे नव्हते “राजकारण”!!
- Karnataka Government : कर्नाटक सरकारने म्हटले- राष्ट्रपती व राज्यपाल हे फक्त नाममात्र प्रमुख; केंद्र व राज्यांतील मंत्रिमंडळाच्या मदत आणि सल्ल्यानुसार कार्य करण्यास बांधील
- Government : 22 सप्टेंबरपासून बिस्किटे-टूथपेस्टसारखी उत्पादने स्वस्त मिळणार; सरकारने कंपन्यांना जुन्या स्टॉकची MRP बदलण्याची परवानगी