• Download App
    वीस लाख जणांना ‘यास’चा फटका, पंतप्रधान मोदी आज करणार पाहणी।PM Modi will review cyclone situation today

    वीस लाख जणांना ‘यास’चा फटका, पंतप्रधान मोदी आज करणार पाहणी

    विशेष प्रतिनिधी

    भुवनेश्वर : पश्चिम बंगाल आणि ओडिशाला जलमय केलेल्या यास चक्रीवादळाने बिहार आणि झारखंडलाही तडाखा दिला आहे. या दोन्ही राज्यांमध्ये जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बंगाल आणि ओडिशाचा दौरा करून बाधित भागांची पाहणी करणार आहेत. PM Modi will review cyclone situation today



    दोन्ही राज्यांत मिळून २० लाखांपेक्षा जास्त लोकांना त्याचा फटका बसला आहे. पाऊस आणि घरे पडल्याने ओडिशातील तिघांचा, तर बंगालमधील एकाचा मृत्यू झाला. ‘यास’ने बुधवारी रात्री एकच्या सुमारास पश्चि्म सिंगभूमच्या मार्गाने झारखंडमध्ये प्रवेश केला. त्यामुळे येथे जोरदार पाऊस कोसळून रस्ते जलमय झाले.

    राज्यात शुक्रवार (ता.२८) पर्यंत पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. चक्रीवादळ दक्षिण झारखंडला पोचल्यानंतर वादळ कमजोर झाले आणि कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या वादळाने पश्चिदम बंगाल व ओडिशात मोठे नुकसान केले. वेगवान वाऱ्यांमुळे अनेक झाडे व विजेचे खांब पडले.

    PM Modi will review cyclone situation today

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार