• Download App
    पंतप्रधान मोदी आज 18 राज्यांमध्ये 91 एफएम ट्रान्समीटरचे उद्घाटन करणार; रेडिओ कनेक्टिव्हिटीला मिळणार चालना!PM Modi will inaugurate 91 FM transmitters in 18 states today

    पंतप्रधान मोदी आज 18 राज्यांमध्ये 91 एफएम ट्रान्समीटरचे उद्घाटन करणार; रेडिओ कनेक्टिव्हिटीला मिळणार चालना!

     रेडिओ सेवा सुमारे दोन कोटी लोकांपर्यंत पोहोचेल, जे आतापर्यंत यापासून वंचित होते

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे १८ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील ८४ जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या ९१ एफएम ट्रान्समीटरचे उद्घाटन करतील. यामुळे सीमावर्ती भागात आणि महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये एफएम रेडिओ कनेक्टिव्हिटीला चालना मिळेल. रेडिओ सेवेचा हा विस्तार पंतप्रधानांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम मन की बातच्या १००व्या भागाच्या प्रसारणाच्या दोन दिवस आधी होणार आहे. PM Modi will inaugurate 91 FM transmitters in 18 states today

    पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) एका निवेदनात म्हटले आहे की, सरकार देशात एफएम कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे. देशभरातील ८४ जिल्ह्यांमध्ये ९१ नवीन 100W FM ट्रान्समीटर बसवण्यात आले आहेत. विशेषत: सीमावर्ती भागात रेडिओ कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी एफएम ट्रान्समीटरचा विस्तार करण्यात आला आहे.

    राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, नागालँड, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, केरळ, तेलंगणा, छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांचा व लडाख आणि अंदमान-निकोबार बेटे यांचा समावेश आहे.

    पीएमओने सांगितले की, ऑल इंडिया रेडिओच्या एफएम सेवेच्या विस्तारानंतर, रेडिओ सेवा सुमारे दोन कोटी लोकांपर्यंत पोहोचेल, जे आतापर्यंत यापासून वंचित होते. तसेच, एफएम रेडिओ कव्हरेज सुमारे ३५००० चौरस किमी क्षेत्रात विस्तारित केले जाईल.

    PM Modi will inaugurate 91 FM transmitters in 18 states today

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!