युक्रेनमधील संघर्ष सोडवण्यासाठी भारताने नेहमीच मुत्सद्देगिरी आणि संवादाचा पुरस्कार केला आहे,
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra modi )23 ऑगस्ट रोजी युक्रेनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाकडून एक निवेदन जारी करून याबाबत माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या कीव भेटीपूर्वी, भारताने सोमवारी सांगितले की, युक्रेनमधील संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी योगदान देण्यास तयार आहोत. पंतप्रधान मोदी 23 ऑगस्ट रोजी युक्रेनच्या राजधानीला भेट देणार असून राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करणार आहेत.
युक्रेनमधील संघर्ष सोडवण्यासाठी भारताने नेहमीच मुत्सद्देगिरी आणि संवादाचा पुरस्कार केला आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव तन्मय लाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. युक्रेनमध्ये सुरू असलेला संघर्ष हा चर्चेचा भाग असेल, असे ते म्हणाले. तन्मय लाल यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, भारताचे रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी स्वतंत्र संबंध आहेत. युक्रेनला जाण्यापूर्वी पंतप्रधान मोदी पोलंडलाही जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या कार्यालयाकडूनही एक निवेदन जारी करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींच्या युक्रेन दौऱ्याबाबत युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २३ ऑगस्ट रोजी युक्रेनच्या राष्ट्रीय ध्वज दिनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेनला अधिकृत भेट देतील. आमच्या द्विपक्षीय संबंधांच्या इतिहासात भारतीय पंतप्रधानांची युक्रेनची ही पहिलीच भेट आहे.
या भेटीदरम्यान, द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सहकार्याच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल, विशेषत: युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी युक्रेन आणि भारत यांच्यात अनेक दस्तऐवजांवर स्वाक्षऱ्या होण्याचीही अपेक्षा आहे.
PM Modi will go Ukraine after Russia
महत्वाच्या बातम्या
- Rakesh Pal : भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे चेन्नईत निधन
- Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांची खुसपटे; पण वरचढ योजनेची तोड का न सापडे??
- Champai Soren : झारखंडच्या माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचा भाजपमध्ये प्रवेश!
- Sukanta Majumdar : ममतांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरूच राहणार ; सुकांता मजुमदार