• Download App
    PM मोदी आज 70 हजार तरुणांना जॉइनिंग लेटर देणार; केंद्र सरकारचा 9 महिन्यांत 7वा रोजगार मेळा, आतापर्यंत 4.33 लाखांना नोकरी|PM Modi will give joining letter to 70 thousand youth today; Central Govt's 7th Employment Fair in 9 Months, 4.33 Lakh Jobs So Far

    PM मोदी आज 70 हजार तरुणांना जॉइनिंग लेटर देणार; केंद्र सरकारचा 9 महिन्यांत 7वा रोजगार मेळा, आतापर्यंत 4.33 लाखांना नोकरी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सातव्या रोजगार मेळाव्यात 70 हजारांहून अधिक तरुणांना जॉइनिंग लेटर देणार आहेत. देशातील 20 हून अधिक राज्यांमध्ये 44 ठिकाणी त्याचे आयोजन केले जाणार आहे.PM Modi will give joining letter to 70 thousand youth today; Central Govt’s 7th Employment Fair in 9 Months, 4.33 Lakh Jobs So Far

    पंतप्रधान मोदी सकाळी 10:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सामील होतील. यादरम्यान पंतप्रधान मोदी देशाला संबोधितही करू शकतात.



    22 ऑक्टोबर 2022 रोजी पंतप्रधानांनी रोजगार मेळाव्याचा पहिला टप्पा सुरू केला. तेव्हा पीएम म्हणाले होते – 2023 च्या अखेरीस देशातील तरुणांना 10 लाख सरकारी नोकऱ्या देण्याचे आमचे लक्ष्य आहे.

    पंतप्रधानांनी गेल्या 8 महिन्यांत 6 रोजगार मेळ्यांमध्ये 4 लाख 33 हजारांहून अधिक लोकांना सामील होण्याचे पत्र दिले आहे.

    या विभागांमध्ये नियुक्ती मिळणार

    देशभरातील निवडलेल्या तरुणांना महसूल विभाग, आर्थिक सेवा विभाग, पोस्ट विभाग, शालेय शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, जल संसाधन विभाग, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग आणि गृह मंत्रालयात नियुक्त्या मिळतील.

    13 केंद्रीय मंत्रीदेखील रोजगार मेळाव्यात सहभागी

    सातव्या रोजगार मेळाव्यात विविध राज्यांतील केंद्रीय मंत्रीही सहभागी होणार आहेत. अहमदाबादचे मनसुख मांडविया, सिमला येथील अनुराग सिंग ठाकूर, मुंबईच्या स्मृती इराणी आणि पीयूष गोयल, नागपूरचे नितीन गडकरी, जयपूरचे अश्निनी वैष्णव, पाटणाहून केंद्रीय मंत्री पशुपती पारस, वडोदराहून पुरुषोत्तम रुपाला, फरिदाबादचे भूपेंद्र यादव, बंगळुरूतून प्रल्हाद जोशी, चंदिगडहून हरदीपसिंह पुरी, सिकंदराबादेतून जी किशन रेड्डी आणि सागरहून डॉ. वीरेंद्र कुमार रोजगार मेळाव्याचा भाग असतील.

    मागच्या रोजगार मेळाव्यात पंतप्रधान म्हणाले होते…

    13 जून रोजी आयोजित केलेल्या सहाव्या रोजगार मेळाव्याला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले होते की, ज्या तरुणांना स्वातंत्र्याच्या सुवर्णकाळात नोकऱ्या मिळाल्या, येत्या 25 वर्षांत या लोकांना विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.

    आज संपूर्ण जग आपल्या विकासाच्या प्रवासात आपल्यासोबत चालण्यास तयार आहे. याआधी कधीही भारतात इतका आत्मविश्वास आणि आपल्या अर्थव्यवस्थेवर इतका विश्वास नव्हता.

    PM Modi will give joining letter to 70 thousand youth today; Central Govt’s 7th Employment Fair in 9 Months, 4.33 Lakh Jobs So Far

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य