• Download App
    पंतप्रधान मोदी करणार २५ सप्टेंबरला आमसभेत भाषण, शंभऱहून जास्त देशांचे प्रमुख उपस्थित राहणारPM modi will address UN

    पंतप्रधान मोदी करणार २५ सप्टेंबरला आमसभेत भाषण, शंभऱहून जास्त देशांचे प्रमुख उपस्थित राहणार

    विशेष प्रतिनिधी

    न्यूयॉर्क – संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यासह जगभरातील शंभरहून अधिक देशांचे प्रमुख प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत.PM modi will address UN

    आमसभेचे हे ७६ वे सत्र २१ ते २७ सप्टेंबर या कालावधीत होईल. पंतप्रधान मोदी २५ सप्टेंबरला आमसभेला संबोधित करणार आहेत. ‘क्वाड’ गटातील देशांच्या बैठकीसाठी ते २४ तारखेलाच अमेरिकेला रवाना होणार आहेत. मोदींसह १०९ देशांचे प्रमुख प्रत्यक्ष उपस्थित रहात भाषण करणार असून ६० देशांचे प्रमुख व्हिडिओ संदेशाद्वारे त्यांचे म्हणणे मांडतील. अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून ज्यो बायडेन हे आमसभेत प्रथमच भाषण करणार आहेत.


    Modi Express : गणरायाची आरती म्हणत प्रवाशांनी व्यक्त केला आनंद, १८०० जणांसह मुंबईहून सावंतवाडीला मोदी एक्स्प्रेस रवाना


    आमसभेत अफगाणिस्तानचे संयुक्त राष्ट्रांमधील राजदूत गुलाम ईसकझाई यांनाही बोलण्याची संधी मिळणार आहे. आमसभेतील अखेरचे भाषण ईसकझाई यांचे असेल. त्यांची नेमणूक अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष अश्रफ घनी यांनी केली होती. त्यांना बदलण्याबाबतचा कोणताही निर्णय तालिबान सरकारने अद्यापपर्यंत घेतलेला नाही. म्यानमार आणि गिनिया या देशांच्या राजदूतांनाही अखेरच्या दिवशी बोलण्याची संधी मिळणार आहे. गिनियामध्ये गेल्याच आठवड्यात लष्कराने बंड करत सत्ता आपल्या हातात घेतली आहे.

    PM modi will address UN

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Central Motor Vehicles Rules : राष्ट्रीय महामार्गांवर टोलचे नियम कडक- टोल थकबाकीदार गाडी विकू शकणार नाहीत, NOC आणि फिटनेस प्रमाणपत्र जारी केले जाणार नाही

    Supreme Court : कर्नल सोफिया अपमानप्रकरणी SCने MPच्या मंत्र्याला फटकारले, म्हटले- माफी मागण्यात उशीर झाला

    Delhi HC : HCचा कुलदीप सेंगरच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार; उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या न्यायिक कोठडीतील मृत्यू प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा