वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपला गुजरात दौरा संपवून तेथून मध्य प्रदेशच्या उज्जैन दौऱ्यावर पोहोचणार आहेत. उज्जैनमध्ये पंतप्रधान श्रीमहाकाल लोकचे उद्घाटन करून ते राष्ट्राला समर्पित करतील. उद्घाटनानंतर पंतप्रधान कमलकुंड, सप्तर्षी, मंडपम आणि नवग्रहाला पायीच भेट देतील. पंतप्रधानांच्या भेटीसाठी मंदिरात विशेष तयारी करण्यात आली आहे. याशिवाय मंदिर प्रशासनानेही अनेक व्यवस्था केल्या आहेत.PM Modi Ujjain visit Today PM Modi will go directly to Ujjain from Gujarat, will inaugurate Shri Mahakal Lok.
जेव्हा पंतप्रधान मोदी उद्घाटनासाठी मंदिरात पोहोचतील तेव्हा सुमारे 600 कलाकार, साधू आणि संत मंत्र आणि शंखनाद करतील. कॉरिडॉरच्या मुख्य गेटवर सुमारे 20 फूट उंचीचे शिवलिंग धाग्याने बनवण्यात आले असून त्यावरून पडदा उचलून कॉरिडॉरचे औपचारिक उद्घाटन करण्यात येणार आहे.
असा आहे श्रीमहाकाल लोक प्रकल्प…
पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणारा श्रीमहाकाल लोक प्रकल्प अनेक अर्थांनी खास आहे. त्याचा पहिला टप्पा जागतिक दर्जाच्या आधुनिक सुविधा देऊन यात्रेकरूंना मंदिरातील त्यांचा अनुभव संस्मरणीय बनविण्यास मदत करेल. या प्रकल्पाचा उद्देश संपूर्ण प्रदेशातील गर्दी कमी करणे आणि वारसा वास्तूंचे संवर्धन आणि जीर्णोद्धार यावर विशेष भर देणे आहे. या प्रकल्पांतर्गत मंदिर परिसराचा सातपट विस्तार करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे 850 कोटी रुपये आहे. मंदिराच्या सध्याच्या यात्रेकरूंची संख्या, जी दरवर्षी सुमारे दीड कोटी आहे, ती दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. हे लक्षात घेऊन हा प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पाच्या विकासाचे नियोजन दोन टप्प्यात करण्यात आले आहे.
या प्रकल्पात विशेष काय?
या प्रकल्पांतर्गत, महाकाल मार्गात 108 खांब (स्तंभ) आहेत जे भगवान शिवाच्या आनंद तांडव स्वरूपाचे (नृत्य स्वरूप) प्रतिनिधित्व करतात. महाकाल मार्गावर भगवान शिवाचे जीवन दर्शविणाऱ्या अनेक धार्मिक मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. मार्गावरील भित्तीचित्रे शिवपुराणातील कथांवर आधारित आहेत, ज्यात निर्मिती कार्य, गणेशाचा जन्म, सती आणि दक्षाच्या कथा इत्यादींचा समावेश आहे. 2.5 हेक्टरमध्ये पसरलेला, प्लाझा परिसर कमळ तलावाने वेढलेला आहे आणि कारंज्यासह शिवाची मूर्ती आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि पाळत ठेवणाऱ्या कॅमेऱ्यांच्या मदतीने इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरद्वारे संपूर्ण कॉम्प्लेक्सचे चोवीस तास निरीक्षण केले जाईल.
असे आहे पंतप्रधानांचे वेळापत्रक
- पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 5 वाजता उज्जैनला पोहोचतील.
- सायंकाळी 5.25 वाजता मोदींचे महाकाल मंदिरात आगमन होईल.
- संध्याकाळी 5:50 वाजता महाकालाचे दर्शन आणि पूजन
- संध्याकाळी 6.20 वाजता मोदी महाकाल मंदिरातून प्रस्थान करतील.
- मोदी संध्याकाळी 6:25 ते 7:05 वाजता श्रीमहाकाल लोकचे उद्घाटन करतील.
- संध्याकाळी 7.30 ते 8 या वेळेत मोदी कार्तिक मेळा मैदानावर जनतेला संबोधित करतील.
PM Modi Ujjain visit Today PM Modi will go directly to Ujjain from Gujarat, will inaugurate Shri Mahakal Lok.
महत्वाच्या बातम्या
- अनिल देशमुखांना कोर्टाचा दिलासा : खासगी रुग्णालयात अँजिओग्राफीस परवानगी, जसलोकमध्ये उपचार
- अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू : शिवसेनेच्या ऋतुजा लटके विरुद्ध भाजपचे मुरजी पटेल
- Mahakal Lok Photos : महाकाल लोकच्या कॉरिडॉरमध्ये हजारो वर्षांचा इतिहास, कारंजे आणि 50 हून अधिक भित्तीचित्रे, अशी आहे वैशिष्ट्ये