Cyclone Tauktae : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दीव येथे भेट देऊन तौकते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत. सकाळी 9.30 वाजता ते दिल्लीहून रवाना होणार आहेत. भावनगरला पोहोचल्यावर तेथून उना, दीव, जाफराबाद आणि महुवाचे हवाई सर्वेक्षण करतील. तेथून परत आल्यावर अहमदाबादमध्ये एक आढावा बैठक घेणार आहेत. गुजरातमध्ये ‘तौकते’ चक्रीवादळामुळे कमीत-कमी 13 जणांचा मृत्यू झाला, तर वादळामुळे बर्याच भागांत मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. PM Modi To Visit Gujrat And diu to Review Damage By Cyclone Tauktae
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दीव येथे भेट देऊन तौकते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत. सकाळी 9.30 वाजता ते दिल्लीहून रवाना होणार आहेत. भावनगरला पोहोचल्यावर तेथून उना, दीव, जाफराबाद आणि महुवाचे हवाई सर्वेक्षण करतील. तेथून परत आल्यावर अहमदाबादमध्ये एक आढावा बैठक घेणार आहेत. गुजरातमध्ये ‘तौकते’ चक्रीवादळामुळे कमीत-कमी 13 जणांचा मृत्यू झाला, तर वादळामुळे बर्याच भागांत मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.
गुजरातेत मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे नुकसान
कमकुवत होण्याआधी सोमवारी रात्री उशिरा गुजरातमध्ये तौकते चक्रीवादळामुळे जोरदार पाऊस पडला आणि या कालावधीत वेगवान वादळाने कित्येक खांब आणि झाडे उन्मळून पडली. घरांचे तसेच रस्त्यांचेही मोठे नुकसान झाले. हवामान खात्याने सांगितले की, तौकते चक्रीवादळ मध्यरात्रीच्या सुमारास गुजरातच्या किनारपट्टीवर “अत्यंत गंभीर चक्रीवादळ” होते. कमकुवत होत हळूहळू “तीव्र चक्रीवादळ वादळा”मध्ये बदलले आणि आता ते “चक्रीवादळ” बनले आहे.
गुजरातमध्ये 13 जणांचा मृत्यू
राज्याचे मुख्यमंत्री विजय रुपाणी म्हणाले की, 16 हजारांहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. 40 हजारांहून अधिक झाडे आणि 70 हजारांहून अधिक विजेचे खांब उखडले गेले आहेत. तर 5951 गावांत वीज गुल आहे. चक्रीवादळामुळे अधिकृत मृत्यूचा आकडा 13 आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असली तरी या वादळाने मोठे नुकसान केले आहे. यात भावनगर, राजकोट, पाटण, अमरेली आणि वलसाडसह गुजरातच्या विविध भागांत कमीतकमी 13 जणांचा बळी गेला. गुजरातमधील वेरावल बंदराजवळ चक्रीवादळामुळे समुद्रात अडकलेल्या मासेमारी बोटीतून तटरक्षक दलाने मंगळवारी आठ मच्छीमारांची सुटका केली.
PM Modi To Visit Gujrat And diu to Review Damage By Cyclone Tauktae
महत्त्वाच्या बातम्या
- Israel Palestine Conflict : हमासच्या रॉकेट हल्ल्यांना इस्रायलचे एअरस्ट्राइकने उत्तर, 213 जणांचा मृत्यू, गाझाची एकमेव कोरोना टेस्टिंग लॅब नष्ट
- ऐवढाही पैसा कमावू नका की बायकोला नवऱ्यापेक्षा पोटगीचे आकर्षण , हर्ष गोयंका यांच्या ट्विटवर स्त्रीद्वेष्टे असल्याची टीका
- विजय मल्याला लंडनच्या न्यायालयाचा दणका, दिवाळखोरीची याचिका फेटाळून लावली
- उत्तर प्रदेशातील दोन सिंहिणींची प्रकृती कोरोनामुळे गंभीर, इटावा लायन सफारीतील गौरी आणि जेनीफरने सोडले खाणे
- कोरोनामुळे आर्थिक तंगी, देशातील साडेतीन कोटी कर्मचाऱ्यांनी पीएफमधून काढले पैसे