• Download App
    बंगळुरू-म्हैसूर प्रवास आता तीन तासांऐवजी फक्त ७५ मिनिटांत पूर्ण होणार PM Modi to inaugurate Bengaluru Mysuru Expressway tomorrow

    बंगळुरू-म्हैसूर प्रवास आता तीन तासांऐवजी फक्त ७५ मिनिटांत पूर्ण होणार

     पंतप्रधान मोदी उद्या हा एक्सप्रेस वे देशाला समर्पित करणार

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या कर्नाटकचा आणखी एक महत्त्वाचा दौरा करणार आहेत.  या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरू-म्हैसूर एक्सप्रेस वे देशाला समर्पित करणार आहेत. ८ हजार ४८० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या ११८ किलोमीटर लांबीच्या एक्स्प्रेस वे मुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ तीन तासांवरून केवळ ७५ मिनिटांवर येणार आहे. पंतप्रधान मोदी या वर्षी सहाव्यांदा कर्नाटकात जात आहेत. राज्यात एप्रिल-मे महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. PM Modi to inaugurate Bengaluru-Mysuru Expressway tomorrow

    पंतप्रधान मोदी उद्या (रविवार) मांड्याचा दौरा करतील. दुपारी १२ वाजता मांड्यातील अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील आणि त्यानंतर ते धारवाडला जाणार आहेत. दुपारी साडेतीन वाजता आयआयटी धारवाडला भेट देतील व दुपारी ४ वाजता विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी व उद्घाटन करतील यावेळी हुबळी-धारवाड दरम्यान दोन रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

    Rajasthan : पुलवामातील शहीदांच्या विधवांच्या समर्थनासाठी भाजपा नेते, कार्यकर्ते उतरले रस्त्यावर

    सध्या कर्नाटकात भाजपाच्या चार विजय संकल्प यात्रा सुरू आहेत. त्यांची सांगता २५ मार्चला मोठ्या जाहीर सभेच्या रूपाने होणार आहे. या जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा कर्नाटकचा दौरा करणार आहेत.

    बंगळुरू-म्हैसूर द्रुतगती मार्गामुळे काय फायदा होणार? –

    NH-275 च्या बंगळुरू-निदाघट्टा-म्हैसूर विभागाच्या 6-लेनिंगचा या प्रकल्पात समावेश आहे. ११८ किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प एकूण ८ हजार ४८० कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आला आहे. यामुळे बंगळुरू आणि म्हैसूर दरम्यानचा प्रवासाचा वेळ सुमारे ३ तासांवरून अवघ्या ७५ मिनिटांपर्यंत कमी होईल. हे क्षेत्राच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल.

    पंतप्रधान मोदी म्हैसूर-खुशालनगर 4-लेन महामार्गाची पायाभरणीही करणार आहेत. सुमारे ४ हजार १३० कोटी रुपये खर्चून ९२ किमी पसरलेला हा प्रकल्प विकसित केला जाणार आहे. कुशलनगरची बंगळुरूशी जोडणी वाढवण्यात हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल आणि प्रवासाचा वेळ ५ वरून केवळ अडीच तासांपर्यंत कमी करण्यात मदत करेल.

    PM Modi to inaugurate Bengaluru-Mysuru Expressway tomorrow

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट