राजस्थानची ही पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन असून, अजमेर ते दिल्ली कॅन्ट दरम्यान धावणार आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थानला वंदे भारताची पहिली भेट देणार आहेत. या अंतर्गत वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला दिल्ली ते जयपूर या मार्गावर हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. या मार्गावरील राजस्थानची ही पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन असेल. पंतप्रधान मोदी आज (बुधवार) सकाळी ११ वाजता दिल्लीहून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. PM Modi to flag off Rajasthans first Vande Bharat Express today
नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची नियमित सेवा उद्यापासून म्हणजेच १३ एप्रिल २०२३ पासून सुरू होणार आहे. ही रेल्वे अजमेर ते दिल्ली कॅन्ट दरम्यान धावणार आहे. या मार्गात जयपूर, अलवर आणि गुडगाव येथेही ट्रेन थांबेल. ही ट्रेन पुष्कर, अजमेर शरीफ दर्गासह राजस्थानमधील प्रमुख पर्यटन स्थळांना जोडण्यासाठी महत्त्वाची ठरेल, असे पीएमओने म्हटले आहे.
अजमेर ते दिल्ली हा प्रवास कमी वेळेत पूर्ण होईल –
वंदे भारत एक्सप्रेस अजमेर ते दिल्ली कॅन्ट हे अंतर ५ तास १५ मिनिटांत पूर्ण करेल. सध्या या मार्गावरील सर्वात वेगवान ट्रेन शताब्दी एक्स्प्रेस आहे, जी दिल्ली कॅंट ते अजमेर दरम्यान ६ तास १५ मिनिटांत प्रवास पूर्ण करते. त्यामुळे, वंदे भारत एक्सप्रेस या मार्गावर धावणाऱ्या सध्याच्या वेगवान ट्रेनपेक्षा ६० मिनिटे अधिक वेगवान असेल.
रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या तपशीलानुसार, वंदे भारत एक्सप्रेस दिल्ली-जयपूर-अजमेर मार्गावर आठवड्यातून ६ दिवस (बुधवार वगळता) धावेल. ट्रेन क्रमांक २०९७७ ट्रेन अजमेरहून सकाळी ६.२० वाजता निघेल. त्यानंतर सकाळी ७.५० वाजता जयपूर, सकाळी ९.३५ वाजता अलवर, सकाळी ११.१५ वाजता गुडगाव आणि ११.३५ वाजता दिल्ली कॅंटला पोहोचेल. तर त्याबदल्यात ट्रेन क्रमांक २०९७८ दिल्ली कॅंट येथून रात्री १८.४० वाजता सुटेल. यानंतर ट्रेन १८.५१ वाजता गुडगाव, २०.१७ वाजता अलवर, २२.०५ वाजता जयपूर आणि २३.५५ वाजता अजमेरला पोहोचेल.
PM Modi to flag off Rajasthans first Vande Bharat Express today
महत्वाच्या बातम्या
- अभिमानास्पद : भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
- पंतप्रधान पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पसरले हास्य; आतापर्यंत १.३ लाख कोटी रुपयांचे अदा करण्यात आले दावे
- ठाकरे – पवार सिल्वर ओकवर भेट; महाविकास आघाडीतील मतभेदांवर चर्चा की काही पॉलिटिकल सरप्राईज एलिमेंट??
- Karnataka election : भाजपाने १८९ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत ५२ नवीन नावं