वृत्तसंस्था
डेहराडून : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंड साठी एक लाख कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांच्या गुंतवणुकीचा संकल्प सोडला. त्याच वेळी 18 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या विविध सुविधांचा शिलान्यासही त्यांनी केला. PM modi takes on family and dynasty parties over the issues of development
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी घराणेशाहीने चालविलेल्या राजकीय पक्षांवर जोरदार टीकास्त्र सोडले. लोकांना गरिबीत खितपत ठेवून त्यांना स्वतःचे राजमुकुट वाचवायचे आहेत. जनता जागृत झाली, तर त्यांचे राजमुकुट वाचणार नाहीत. ही त्यांना भीती वाटते आहे आणि म्हणून त्यांना जनतेसाठी काम करायचे नाही तर आपल्या फक्त परिवाराचे भले करायचे आहे, अशा तिखट शब्दांमध्ये मोदींनी देशातील घराणेशाहीच्या राजकीय पक्षांवर टीकास्त्र सोडले आहे.
मागच्या सरकारांनी पहाडी प्रदेशांकडे सर्वच विकास कामांच्या बाबतीत दुर्लक्ष केले होते. सीमावर्ती भागांमध्ये पायाभूत सुविधा रस्ते उभ्या करू दिल्या नाहीत. भारतीय सैन्य दलाचे सर्व बाबतीत मनोधैर्य खचेल, अशीच त्यांची वर्तणूक होती. परंतु 2014 नंतर पहाडी क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधा तयार करण्याचे आम्ही नुसते संकल्पच केले नाहीत, तर ते प्रत्यक्षात आणून दाखवले आहेत. पहाडी प्रदेशात बाराशे किलोमीटरचे महामार्ग गेल्या सात वर्षात पूर्ण झाले आहेत सैन्य दलांसाठी वन रैंक वन पेंशन ही दीर्घ काळाची मागणी केंद्रात आमचे सरकार आल्यावर पूर्ण झाली आहे, याची आठवण पंतप्रधान मोदींनी यावेळी करून दिली.
उत्तराखंड सारख्या पहाडी प्रदेशात एम्सच्या धर्तीवर तीन रुग्णालये उभी करण्याचा संकल्प आहे. यातले ऋषिकेशचे रुग्णालय सुरू झाले आहे. बाकीच्या दोन रुग्णालयांची उभारणी येत्या पाच वर्षात करण्यात येईल. सैन्य दलांसाठी पायाभूत सुविधांची कोणतीही कमतरता ठेवायची नाही, हा आमचा पुढच्या पाच वर्षांचा संकल्प आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे.
आजच्या डेहराडूनच्या जाहीर सभेतून त्यांनी एक प्रकारे भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडल्याचे मानले जात आहे. या नंतरच्या काळात 16 डिसेंबरला राहुल गांधींची डेहराडून मध्ये जाहीर सभा होणार आहे. भाजपच्या आजच्या शक्ती प्रदर्शनानंतर काँग्रेस कशा पद्धतीने शक्तिप्रदर्शन करते?,
हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.
PM modi takes on family and dynasty parties over the issues of development
महत्त्वाच्या बातम्या
- नशीब महाराजांच्या दरबारात मुजरा व्हायचा असे म्हणाले नाहीत ; अतुल भातखळकरांची जावेद अख्तर यांच्यावर खोचक टीका
- राष्ट्रपती रायगडावर हेलिकॉप्टरने नव्हे, रोपवेने येणार; शिवभक्तांच्या भावनांचा आदर राखल्याबद्दल खा. संभाजीराजेंनी मानले आभार
- धक्कादायक : शेतकऱ्याने विकला ११२३ किलो कांदा, हाती आले १३ रुपये, राजू शेट्टी म्हणतात- यातून सरकारचं तेरावं घालायचं का?
- कुसुमाग्रजांचे नाव दिले, पण सावरकरांचे नाव न देण्याचा देण्याचा अट्टाहासातून दोन्ही महनीयांची उंची कमी करत नाही का? फडणवीसांचा परखड सवाल