• Download App
    PM Modi पीएम मोदींचा काँग्रेसवर घणाघात, म्हणाले- सत्ता

    PM Modi : पीएम मोदींचा काँग्रेसवर घणाघात, म्हणाले- सत्ता ही तर काँग्रेसच्या शाही परिवारासाठी ‘एटीएम’

    PM Modi

    विशेष प्रतिनिधी

    नांदेड : PM Modi विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सलग दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात सभा झाल्या. नांदेड, अकोला येथील सभेत त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करताना ज्या राज्यात त्यांची सत्ता येते ती राज्ये त्यांच्या शाही परिवारासाठी ‘एटीएम’ बनतात,’ असा आरोप केला. पंडित नेहरूंपासून ते काँग्रेसच्या आताच्या नेतृत्वापर्यंत सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारंवार अपमान केला. इतकेच काय, बाबासाहेबांच्या पंचतीर्थांचे कधी काँग्रेस नेत्याने दर्शन घेतले का? असा सवालही मोदींनी उपस्थित केला.PM Modi

    पंतप्रधान म्हणाले, ‘सध्या तेलंगण आणि कर्नाटकसारखी राज्ये ही काँग्रेसचे ‘एटीएम’ बनली आहेत. कर्नाटकमध्ये वसुली डबल झाली आहे. तेथील दारू दुकानदारांकडून ७०० कोटी रुपयांची वसुली काँग्रेसने केलीय. घोटाळे करूनच निवडणूक लढवणारा हा पक्ष आहे. तो जिंकल्यानंतर किती घोटाळे करतील याची कल्पना करा.



    कर्नाटकात येऊन आमची गॅरंटी पाहा, विमान पाठवतो : काँग्रेस

    काँग्रेसने कर्नाटक, तेलंगण, हिमाचल प्रदेशात जाहीर केलेल्या गॅरंटी दिल्या नाहीत अशा खोट्या जाहिराती वर्तमानपत्रात देऊन भाजपने राज्यातील जनतेची दिशाभूल केली, असा आरोप हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खू, तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, व कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केला. या गॅरंटी कशा पद्धतीने लागू केल्या आहेत व त्यांचा किती लोकांना लाभ झाला आहे याची आकडेवारीसह सविस्तर माहिती दिली. डीके म्हणाले की, भाजपच्या नेत्यांनी कर्नाटकात येऊन काँग्रेस गॅरंटीची अंमलबजावणी पाहावी. त्यासाठी मी त्यांना विमान पाठवतो. सुख्खू म्हणाले की, काँग्रेसचे सरकार येताच पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत जुनी पेन्शन योजना लागू केली. रेवंत रेड्डी या वेळी म्हणाले की, तेलंगणात शेतकऱ्यांना सरसकट २ लाख रुपयांची कर्जमाफी दिली आहे.

    कलम ३७०, राम मंदिराचीही करून दिली आठ‌वण

    जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू करण्याचे काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. हे षड्यंत्र यशस्वी झाल्यास बाबासाहेबांचे संविधान पुन्हा काश्मीरबाहेर जाईल. संविधान घेऊन फिरणारे ढोंगी आहेत. त्यांनी ७५ वर्षांत काश्मीरमध्ये संविधान लागू होऊ दिले नाही, अशी टीका मोदी यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता केली.

    ९ नोव्हेंबर ही ऐतिहासिक तारीख

    ९ नोव्हेंबर २०१९ रोजी राम मंदिराचा न्यायालयात निकाल लागला होता. हा संदर्भ देत ९ नोव्हेंबरच्या सभेत मोदी म्हणाले, ‘आजच्या दिवशी २०१९ मध्ये राम मंदिर प्रकरणात निकालाचा निर्णय आला होता. त्या वेळी संपूर्ण देशातील सर्वांनी एकतेचे दर्शन घडवले होते.’

    मविआ म्हणजे भ्रष्टाचार, टोकन मनी

    मोदी म्हणाले- आम्ही वाढवण बंदरासाठी ८० हजार कोटींची तरतूद केली. काँग्रेस आघाडी सरकारने गत अनेक दशकांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळू दिला नव्हता. मात्र हा दर्जा केंद्र सरकारने मिळवून दिला. मविआ म्हणजे भ्रष्टाचार. काँग्रेसचे घाेषणा नव्हे, तर घाेटाळापत्र अाहे. मविआ म्हणजे भ्रष्टाचार, टाेकन मनी व गप्पा, असेही ते म्हणाले.

    PM Modi slams Congress, says power is ‘ATM’ for royal family of Congress

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांची मुलगी अदितीच्या नावाने बनावट फेसबुक पेजवरून वादग्रस्त पोस्ट

    Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?

    Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!