नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात सर्वसामान्यांना हवेत ते मुद्दे जोरावर आणि विरोधकांचे मुद्दे वाऱ्यावर असाच प्रकार घडला. नरेंद्र मोदी विरोधकांच्या जाळ्यात बिलकुल अडकले नाहीत. विरोधकांनी उंगल्या करून उपस्थित केलेल्या एकाही मुद्द्याला त्यांनी उत्तर दिले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला उद्देशून भाषण करणार म्हटल्याबरोबर विरोधकांना वेगवेगळ्या उंगल्या करण्याची उबळ आली होती. ती त्यांनी सोशल मीडियावर भागवून घेतली. मोदींना वेगवेगळ्या मुद्द्यांवर डिवचले. मोदींचे अमेरिकेतले मित्र भारताला सगळ्या बाजूने अडचणीत आणताना मोदी त्यांच्यावर काही बोलतील का??, एच वन बी व्हिसा संदर्भात काही घोषणा करतील का??, मोदींच्या अमेरिकेतल्या मित्राने लादलेल्या ज्यादा टेरिफवर काही उतारा देतील का??, असे मोदींना अडचणीत आणणारे सवाल करून जयराम रमेश आणि अन्य नेत्यांनी सोशल मीडियावर ढोल पिटले होते. काही विरोधकांनी मतं चोरीचा मुद्दा उपस्थित उपस्थित करून राहुल गांधींना खुश करायचा प्रयत्न केला.
– विरोधकांच्या मुद्द्यांची दखलही नाही
पण मोदींनी विरोधकांच्या एकाही मुद्द्याची दखल घेतली नाही. त्यांनी जसे डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुठल्याच पत्रकार परिषदेला तोंडी उत्तर दिले नाही, जे उत्तर द्यायचे ते कामातून दिले, त्याचप्रमाणे त्यांनी सगळ्या विरोधकांना टांगून ठेवून थेट जनतेला हव्या असणाऱ्या मुद्द्यांवर सरळ आणि साधे भाष्य केले. जीएसटी कमी करण्याचा अर्थ समजावून सांगितला. सणवाराच्या काळात जास्तीत जास्त भारतीय वस्तू खरेदी करून भारतीय उद्योग आणि भारतीय व्यापारी यांचा तोटा कमी करा जेणेकरून अमेरिकेचे जादा टेरिफ भारतावर परिणामकारक ठरू शकणार नाहीत, असा संदेश त्यांनी दिला. सणवाराच्या काळात लोकांना शांतता आणि आनंद हवा असतो. त्या पलीकडच्या राजकारणाच्या चिखलात सर्वसामान्य लोक पडत नाहीत. राजकीय चिखलफेकीच्या लोकांवर परिणामही होत नाही. ही नाडी बरोबर मोदींनी ओळखली. विरोधक जरी त्यांच्यावर चिखलफेक करत राहिले, तरी मोदी त्यांना उत्तर द्यायच्या फंदात पडले नाहीत. त्या उलट लोकांना हव्या असलेल्या मुद्द्यांवर भर देत त्यांनी भारतातला अंतर्गत व्यापार आणि उत्पादन वाढवणे या विषयांना प्राधान्य दिले.
विरोधकांच्या जुन्याच आरोपांच्या फैरी
त्यामुळे विरोधकांनी संतापून मोदींच्या भाषणावर टीका केली. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी घटलेल्या जीएसटीचे क्रेडिट ममता बॅनर्जी यांना देऊन टाकले. मोदींनी जीएसटी कपातीतून बचत महोत्सवाचा उल्लेख केल्यामुळे मल्लिकार्जुन खर्गे यांनी 55 लाख कोटी रुपयांच्या आकड्याचा शोध लावून तेवढा जीएसटी गोळा झाल्याचा दावा केला. विरोधकांना मोदींच्या भाषणात नवीन काही सापडले नाही त्यांनी देखील जुन्याच आरोपांच्या फैरी झाडल्या.
PM Modi says Next Gen reforms will benefit poor, middle-class
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींचा ‘व्होट चोरी’ बॉम्ब फुसका, आरोप निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरच उघडे
- सहा वर्षांत एकही निवडणूक नाही! 474 पक्षांचा ‘गेम ओव्हर’
- सध्या भारतात “दुबळे” पंतप्रधान; तर मग यासीन मलिकला हाफिज सईदच्या भेटीला पाकिस्तानात पाठवणारे पंतप्रधान “बळकट” होते का??
- BAPS organization : अमेरिकेतील BAPS संस्थेविरुद्धचा तपास बंद; न्यू जर्सी मंदिर प्रशासनावर कामगारांचे शोषण- मानवी तस्करीचा होता आरोप