अलीगढमध्ये पंतप्रधान मोदींचं विधान
विशेष प्रतिनिधी
अलीगढ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अलीगढमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्यावर जोरदार निशाणा साधला.PM Modi said in Aligarh Time has come to rid the country completely of poverty and corruption
अलीगढच्या नुमाईश मैदानावर रॅलीला संबोधित करताना मोदी म्हणाले की, याच मैदानात मला अलिगढच्या लोकांना भेटण्याची अनेकवेळा संधी मिळाली आहे, शेवटच्या वेळी मी अलीगढला आलो होतो तेव्हा, मी तुम्हा सर्वांना समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या घराणेशाही, भ्रष्टाचार व तुष्टीकरणाच्या फॅक्टरीला टाळे ठोकण्याच विनंती केली होती, तुम्ही ते इतके मजबूत टाळे लावले की आजतागायत दोन्ही राजपुत्रांना चावी सापडलेली नाही.
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी निवडणूक प्रचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप आणि विरोधी पक्षांचे नेते आपापल्या उमेदवारांच्या समर्थनार्थ रॅली काढत आहेत.
दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी भाजपकडून मोठ्या प्रमाणात रॅली होत आहेत. आज म्हणजेच सोमवारी मुख्यमंत्री योगी आणि पंतप्रधान मोदी यांच्याशिवाय उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांच्याही सभा होणार आहेत. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य सीतापूरमध्ये निवडणूक रॅलींना संबोधित करणार आहेत, तर उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक लखीमपूर खेरी आणि उन्नावमध्ये निवडणूक रॅलींना संबोधित करणार आहेत.
PM Modi said in Aligarh Time has come to rid the country completely of poverty and corruption
महत्वाच्या बातम्या
- राजस्थानात मोदींची विराट सभा, म्हणाले- काँग्रेसने देशाला पोकळ केले, देशातील तरुणांना या पक्षाचे पुन्हा तोंडही पाहायचे नाही
- नितीन गडकरींचा काँग्रेसवर हल्लाबोल, हिंगोलीच्या सभेत म्हणाले- काँग्रेसने 80 वेळा घटना तोडण्याचे पाप केले
- हाँगकाँगमध्ये एव्हरेस्ट आणि MDH मसाल्यांवर बंदी; दोन्ही कंपन्यांच्या करी मसाल्यांमध्ये अति प्रमाणात कीटकनाशके, कर्करोगाचा धोका
- मल्लिकार्जुन खरगेंची सतनामध्ये सभा, राहुल गांधींना फूड पॉइझनिंग झाल्याची दिली माहिती