वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, 2047 पर्यंत आपल्या स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होऊन भारत एक विकसित देश बनेल.ते म्हणाले की, भारत हा एक अब्ज भुकेल्या पोटांचा देश मानला जात होता, पण आता एक अब्ज महत्त्वाकांक्षी मने आणि दोन अब्ज कुशल हात आहेत.PM Modi said- Earlier there were one billion starving people in the country, now two billion skilled hands; India will become a developed country by 2047
पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पीएम मोदी म्हणाले की, जगातील सर्वात जास्त तरुण लोकसंख्याही आपल्याकडे आहे. भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलत आहे. एका दशकात भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. भारत लवकरच तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. आपल्याकडे लोकशाही, लोकसंख्या आणि विविधता होती, आता आपण चौथा ‘डी’ म्हणजेच विकास जोडला आहे. आज आपल्याकडे एक संधी आहे, जेव्हा आपण पुढील एक हजार वर्षांच्या विकासाचा मार्ग मोकळा करू शकतो. भ्रष्टाचार, जातीयवाद, प्रांतवाद यापासून दूर राहून प्रत्येक देशवासीयाला चांगले जीवन जगण्याची संधी मिळेल.
नऊ वर्षांच्या स्थिर सरकारमुळे सुधारणांना गती मिळाली : पंतप्रधान मोदी म्हणाले., जनतेच्या निर्णायक निर्णयामुळे स्थिर सरकार आले. त्यामुळे धोरणाची अंमलबजावणी आणि सुधारणांच्या कामांना चालना मिळाली आहे. रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्मच्या स्पष्ट रोडमॅपमुळे हे घडले आहे.
आम्ही जगात तंत्रज्ञानाच्या समान वितरणाच्या बाजूने
मोदी म्हणाले, जगात सर्व देशांमध्ये तंत्रज्ञानाचे समान वितरण व्हावे. आम्ही तंत्रज्ञान लोकशाहीकरणाच्या बाजूने आहोत. आमच्या देशात डिजिटल व्यवहार विकसित झाले आहेत, आम्ही जी-२० दरम्यान सदस्य देशांसोबत डिजिटल अर्थव्यवस्था सामायिक केली आहे.
सौरऊर्जेची क्षमता काही वर्षांत 20 पटींनी वाढली
21व्या शतकात जग खूप वेगळे आहे. भारताने काही वर्षांत सौरऊर्जा क्षमता वीस पटीने वाढवली. पवन ऊर्जेतही जगात पहिल्या 4 देशांमध्ये आहोत. जी-20 देशांत जैवइंधन लक्ष्य साध्य करण्यात भारत आघाडीवर आहे. आम्ही लवकरच बायो फ्यूएल अलायन्स तयार करू.
जी-20च्या 1 लाख प्रतिनिधींनी भारतीय लोकशाही पाहिली
मोदी म्हणाले- जी-20 चे एक लाख प्रतिनिधी भारतात आले. त्यांनी लोकशाही , विविधता पाहिली. तिसऱ्या जगातील देशांमध्ये आत्मविश्वास आला आहे. भारताचा नागरिक -आधारित दृष्टिकोन इतर देशांसाठी आदर्श आहे. आपला ‘सबका साथ सबका विकास’ हे जागतिक कल्याणाचे मॉडेल ठरू शकते.
काश्मीर-अरुणाचलमध्ये जी-20 बैठक घेण्याबाबत पाकिस्तान आणि चीनच्या आक्षेपावर प्रश्न विचारण्यात आला होता त्यासंदर्भात ते म्हणाले – इथे जी-२० होत असताना देशाच्या सर्व भागात बैठका व्हाव्यात हे स्वाभाविक नाही का? पूर्वी सरकारे दिल्लीत मोठे कार्यक्रम आयोजित करत. कारण त्यांचा लोकांच्या क्षमतेवर विश्वास नव्हता.
खोट्या बातम्या समाजात विष पसरवतात, त्या रोखण्यास प्राधान्य मोदी म्हणाले, डार्कनेट, सायबर दहशतवाद आणि ऑनलाइन कट्टरता हा मोठा धोका आहे. ते पुढे म्हणाले, खोट्या बातम्या समाजात विष पसरवतात. ते रोखण्याला प्राधान्य आहे. आम्ही सायबर क्राइमवर जी-२० परिषद घेतली, आता जागतिक परिषद घेऊन सर्वसमावेशक योजना बनवायची आहे.
PM Modi said- Earlier there were one billion starving people in the country, now two billion skilled hands; India will become a developed country by 2047
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation :”…म्हणजे याचाच अर्थ मराठा आरक्षणाला शरद पवार यांचा पाठिंबा नाही” भाजपाने साधला निशाणा!
- उत्तर प्रदेशमधील बाराबंकीमध्ये मोठी दुर्घटना! तीन मजली इमारत कोसळल्याने दोघांचा मृत्यू, अनेकजण जखमी
- ”बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर ‘इंडी’ आघाडीचे गोडवे गाणाऱ्या उद्धव ठाकरेंचे…” एकनाथ शिंदेंचे विधान!
- सनातन धर्माचा अपमान करणाऱ्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या “दिवट्या” मुलावर एकनाथ शिंदे संतापले!!