• Download App
    PM Modi साहित्य संमेलनाच्या उद्घाटनात संघ आणि मराठीचा संबंध सांगत मोदींचा पवारांसमोर पुरोगाम्यांना अप्रत्यक्ष टोला!!

    साहित्य संमेलनाच्या उद्घाटनात संघ आणि मराठीचा संबंध सांगत मोदींचा पवारांसमोर पुरोगाम्यांना अप्रत्यक्ष टोला!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मराठी यांचा दृढ संबंध सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर पुरोगाम्यांना अप्रत्यक्ष टोला हाणला.

    गेल्या काही वर्षांमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ यांच्यावर तथाकथित पुरोगाम्यांचे वर्चस्व असल्याने “निवडक” मराठी साहित्यिक हे संघ किंवा हिंदुत्ववादी विचारांना “टॅबू” मानतात. मराठीचा आणि संघाचा किंवा हिंदुत्ववादी विचारांचा काही संबंध आहे हे सांगण्याचे टाळतात. या पार्श्वभूमीवर राजधानी नवी दिल्लीत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपण मराठी कशी शिकलो आणि आपला मराठीशी संबंध कसा आला, या संदर्भात सांगताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आवर्जून उल्लेख केला.

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मुहूर्तमेढ एका मराठी माणसाने १०० वर्षांपूर्वी रोवली. देशातल्या आणि जगातल्या लाखो तरुणांना देशसेवेची प्रेरणा दिली. यापैकीच आपण एक आहोत. मला अभिमान आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मला घडविले आणि देशसेवेची प्रेरणा दिली. संघात आल्यामुळेच माझा मराठीशी संबंध आला आणि मराठी शिकता आली याचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांच्यासमोर केला.

    आपल्या संपूर्ण भाषणात पंतप्रधान मोदींनी मराठीसाठी योगदान देणाऱ्या सर्व साहित्यिकांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, शिवरामपंत परांजपे, माधव श्रीहरी अणे, वीर सावरकर, आचार्य अत्रे, मामासाहेब वरेरकर, ग दि माडगूळकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर आदींचा यात समावेश होता. मोदींनी मराठी भाषक साहित्याचा यावेळी समग्र आढावा घ्यायचा प्रयत्न केला. दलित साहित्याचा त्यांनी विशेषत्वाने उल्लेख केला.

    परंतु गेल्या काही वर्षांमध्ये मराठी साहित्यिकांनी जो विषय “टॅबू” मानून टाळला होता, तो संघाचा विषय आणि संघाची मुहूर्तमेढ रोवण्यात मराठी माणसाचे योगदान या विषयावर पंतप्रधान मोदींनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात भाष्य केले.

    बाकी शरद पवारांचे भाषण झाल्यानंतर त्यांना उठून अभिवादन करताना खुर्ची पुढे सरकवली त्यांना ग्लासमध्ये पाणी भरून दिले वगैरे बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या.

    PM Modi praise Marathi language contribution in RSS patriotism

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Telangana : तेलंगणातील गावांमध्ये आठवडाभरात 500 कुत्र्यांची हत्या; 6 लोकांविरुद्ध FIR

    Army Chief : भारताच्या लष्करप्रमुखांनी ठणकावले- शक्सगाम खोऱ्यावरील पाकिस्तान-चीन करार अवैध, भारताला हे मान्य नाही

    Army Chief General Dwivedi : लष्करात महिला-पुरुषांसाठी समाननिकष लावण्याचा प्रयत्न- जन. द्विवेदी; लष्करप्रमुखांनी घेतली पहिलीच पत्रकार परिषद