भारताने ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानातल्या नूर खान हवाई तळावर आणि किराणा हिल्स वर केलेल्या हल्ल्याची खुन्नस अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काढली. भारतावर 50% टेरिफ लादला. त्या पाठोपाठ पाकिस्तानचा जनरल असीम मुनीर याला दुसऱ्यांदा अमेरिका भेटीचे निमंत्रण दिले. भारताने या सगळ्याला ताबडतोब प्रत्युत्तर देखील दिले, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी निमित्त केलेल्या भाषणामध्ये जो “वैयक्तिक किंमतीचा” उल्लेख केला, त्यामुळे या विषयाला खऱ्या अर्थाने गंभीर वळण लागले.
भारत आपल्या शेतकऱ्यांच्या, पशुपालकांच्या आणि मच्छीमारांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही. मला माहिती आहे, की याची मला वैयक्तिक किंमत चुकवावी लागेल पण त्यासाठी भारत तयार आहे, अशा परखड शब्दांमध्ये नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव न घेता अमेरिकेला प्रत्युत्तर दिले. भारताच्या कृषी क्षेत्रामध्ये पशुपालन क्षेत्रामध्ये अमेरिकेला शिरगाव करायचा आहे तो भारत होऊ देत नाही म्हणून वेगवेगळ्या मार्गांनी भारतावर दादागिरी करायचे काम सुरू आहे, असे मोदींनी अप्रत्यक्षपणे सूचित केले.
मोदींच्या वक्तव्याचा अर्थ काय
पण या भाषणादरम्यान मोदींनी याची मला “वैयक्तिक किंमत” चुकवावी लागेल हे जे उद्गार काढले, त्याचा नेमका अर्थ काय आणि त्याचे गांभीर्य काय??, याचा विचार करायची खरी गरज आहे. कारण मोदी एकतर राजनैतिक संबंधांवर किंवा व्यापारी संबंधांवर जाहीरपणे फारसे भाष्य करत नाहीत. ते केले तर फक्त संदर्भ मूल्य म्हणून करतात. त्यापलीकडे ते रोज डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखे पत्रकारांसमोर येऊन कुठल्या धोरणावर उथळपणे भाष्य करत नाहीत. पण मोदींनी आजच्या भाषणामध्ये “वैयक्तिक किंमत” चुकवावी लागेल, हे उद्गार काढून ट्रम्प यांच्या टेरिफ दादागिरीचे गांभीर्य भारताच्या जनतेसमोर मांडले.
मोदींना “वैयक्तिक किंमत” चुकवावी लागेल म्हणजे नेमके काय?? त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीला 11 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याचबरोबर त्यांची वयाची 75 वर्षे पूर्ण होत आहेत म्हणून त्यांच्यावर वेगवेगळ्या मार्गांनी दबाव आणून त्यांना पदावरून बाजूला केले जाईल का??, किंबहुना कुणी बाजूला करू शकतील का??, त्याचबरोबर अन्य कुठली वैयक्तिक किंमत त्यांना चुकवावी लागेल??, याविषयी राजकीय वर्तुळांमध्ये शंका कुशंकांनी काहूर माजवायला सुरुवात झाली आहे.
अमेरिकेचा कुप्रसिद्ध इतिहास
आपल्याला न पटणाऱ्या आणि आपल्यापुढे न झुकणाऱ्या अन्य देशातल्या सत्ताधाऱ्यांना वेगवेगळ्या मार्गांनी हैराण करायचे आणि नंतर बाजूला करायचे हा अमेरिकन परराष्ट्र धोरणाचा एक महत्त्वाचा कारस्थानी भाग आहे. अमेरिकेचा तो कुप्रसिद्ध इतिहासाचा आहे. तसलेच कुठले कारस्थान अमेरिकेत मोदींविरुद्ध रचले जात नाही ना??, याविषयी देखील दाट शंका समोर यायला सुरुवात झाली आहे.
रशिया + चीनशी हातमिळवणी
अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाच्या दादागिरीला काटशह देण्यासाठी मोदींनी रशिया आणि चीन यांच्याशी जवळीक वाढविली. यातला रशिया भारताचा विश्वासू मित्र आहे पण चीन तेवढा विश्वासू सहकारी नाही तरी देखील ट्रम्प प्रशासनाने कोंडी केल्यामुळे मोदींना अपरिहार्यपणे रशियाबरोबरच चीनशी देखील हातमिळवणी करावी लागली आहे. पण या हातमिळविणीला फार मर्यादा आहेत. शिवाय मोदींना चुकवावी लागणारी “वैयक्तिक किंमत ही त्या पलीकडची असू शकते, अशी दाट संशयाची पेरणी झाली आहे.*
PM Modi personally will have to pay the price of Trump tariff dadagiri
महत्वाच्या बातम्या
- Khalid Ka Shivaji : प्रदर्शित होण्यापूर्वीच ‘खालिद का शिवाजी’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; हिंदू महासभेची सेन्सॉर बोर्डाकडे बंदीची मागणी
- Ukraine : रशियाच्या तेल डेपोवर युक्रेनचा ड्रोन हल्ला; स्फोटाचा व्हिडिओ बनवणाऱ्या दोन रशियन मुलींना अटक
- Anjali Damania : अंजली दमानियांना शिरपूर न्यायालयाचे वॉरंट; 23 सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश, एकनाथ खडसे मानहानी प्रकरण
- Sanjay Nirupam : संजय निरुपम यांचा गंभीर आरोप- मुंबईत गृहनिर्माण जिहाद; जोगेश्वरी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत मुस्लिम बिल्डरांकडून षडयंत्र