अमित शाह म्हणाले, दहशतवाद्यांचा पूर्णपणे खात्मा करण्यासाठी आम्ही वचनबद्ध
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : PM Modi पुलवामामध्ये सहा वर्षांपूर्वी १४ फेब्रुवारी रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात अनेक सैनिक शहीद झाले होते. यानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हल्ल्यात शहीद झालेल्या ४० सीआरपीएफ जवानांना श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी अमित शाह म्हणाले की, मोदी सरकार दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेचे धोरण घेऊन पुढे जात आहे आणि आम्ही दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी कटिबद्ध आहोत.PM Modi
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
पंतप्रधान मोदी म्हणाले की, पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. येणारी पिढी या शहीदांचे बलिदान आणि देशावरील त्यांचे प्रेम कधीही विसरणार नाही. येणारी पिढी त्यांचे शौर्य विसरणार नाही.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनीही पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांनी म्हटले आहे की, ‘संपूर्ण देशाच्या वतीने, २०१९ मध्ये आजच्याच दिवशी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. संपूर्ण मानवतेचा सर्वात मोठा शत्रू दहशतवाद आहे. संपूर्ण जग दहशतवादाविरुद्ध एकजूट आहे.’
PM Modi pays tribute to the martyrs of Pulwama attack
महत्वाच्या बातम्या
- Harshawardhan Sapkal ओसाड माळावरच्या जहागिरीला… म्हणून सपकाळ याना बसविले घोड्यावर
- Mahadev Munde बीडमध्ये आणखी एक एसआयटी, महादेव मुंडे खून प्रकरणी तपासासाठी विशेष पथक
- Mohammad Yunus : मोहम्मद युनूस सरकारच्या काळात हिंदूंना केले गेले लक्ष्य!
- रेस मधली चार बडी नावे बाजूला सारून हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष!!