• Download App
    आंबेडकर + सावरकर + बाळासाहेबांच्या स्मारकांवर जाऊन मोदींची श्रद्धांजली!!|PM Modi pays tribute to Ambedkar + Savarkar and Balasheb thackeray!!

    आंबेडकर + सावरकर + बाळासाहेबांच्या स्मारकांवर जाऊन मोदींची श्रद्धांजली!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महायुतीच्या मुंबईतल्या प्रचार सभेच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतरत्न घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकांवर जाऊन या तिन्ही महान नेत्यांना श्रद्धांजली अर्पण केली.PM Modi pays tribute to Ambedkar + Savarkar and Balasheb thackeray!!



    महायुतीच्या महासभेसाठी पंतप्रधान मोदींचे मुंबईत सायंकाळी आगमन झाल्यानंतर ते प्रथम दादरच्या चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या दर्शनाला गेले. तिथे त्यांनी आंबेडकरांना पुष्पांजली अर्पित करून शांती प्रार्थना केली.

    त्यानंतर मोदी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या राष्ट्रीय स्मारक स्थळी पोहोचले तिथे सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पित करून त्यांनी स्मारकातले सावरकरांच्या जीवनासंदर्भातले म्युरल पाहिले. सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनी मोदींचे स्वागत केले आणि त्यांना स्मारकाची माहिती दिली.

    त्यानंतर मोदींनी शिवाजी पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला भेट देऊन बाळासाहेबांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली. या तिन्ही महान नेत्यांच्या स्मारकाला भेटी देताना मोदींसमवेत महायुतीचे कोणतेही नेते बरोबर नव्हते, तर मोदींनी एकट्याने स्मारकांवर जाऊन सर्व नेत्यांना आदरांजली अर्पित केली. यावेळी महायुतीचे नेते शिवाजी पार्कच्या सभेमध्ये जनतेला संबोधित करत होते.

    PM Modi pays tribute to Ambedkar + Savarkar and Balasheb thackeray!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Semiconductor : केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत 4 नवीन सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी; सरकार 4,594 कोटी रुपये गुंतवणार

    प्राणी हक्क आणि सार्वजनिक आरोग्य यांच्यातील संघर्ष: न्यायालयाच्या निर्णयांनी देशभर खळबळ!

    दुधाची तहान ताकावर भागवण्याचा लागला छंद; मोदी + शाहांचा “पराभव” केल्याचा विरोधकांना “आनंद”!