- पंतप्रधान मोदी यांनी गुरुनानक जयंतीच्या दिल्या शुभेच्छा… कृषी कायद्यांवर मांडली भूमिका
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : प्रकाश पर्व अर्थात गुरुनानक जयंती दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला संबोधित करताना काय बोलणार याकडेे सगळ्यांचं लक्ष होतं. अखेर प्रतिक्षा संपली. पंतप्रधान मोदी यांनी तिन्ही कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. PM MODI LIVE: Good news for farmers! Today is Guru Nanak Jayanti – Three agricultural laws repealed
देशातील कृषी वैज्ञानिक, शेतकरी संघटना यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही कायदे आणले पण केंद्रीय कृषी कायद्यांचा विषय सुप्रीम कोर्टात गेला.
आता आम्ही हे कायदे रद्द करत असल्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
करतारपूर कॉरिडॉर खुलं करणार
दीड वर्षानंतर कर्तारपूर कॉरिडॉर खुला झाला आहे. गुरुनानक यांनी संसारात सेवेचा मार्ग अवलंबल्यास जीवन यशस्वी होतं, असं मोदी म्हणाले. आमचं सरकार सेवा भावनेतून देशवासियांचं जीवन सुलभ बनवण्यास कटिबद्ध आहे. गेल्या अनेक पिढ्या स्वप्न पाहत होती ती स्वप्न पूर्ण करत आहे. माझ्या राजकीय जीवनात मी शेतकऱ्यांच्या समस्या अनुभवल्या आहेत. देशानं मला पंतप्रधान म्हणून संधी दिल्यानंतर मी शेती विकासाला प्राधान्य दिलं.
आज गुरु नानक यांची जयंती असून, त्यांची जयंती प्रकाश पर्व आणि गुरू पर्व म्हणून साजरी केली जाते. या निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील महोबा येथे सिंचन योजनेचं लोकार्पण करणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
आपल्या संबोधनात मोदी म्हणाले, “पाच दशकांच्या आयुष्यात मी शेतकऱ्यांच्या अडचणी आणि आव्हानं मी खुप जवळून बघितली आहेत. २०१४ पासून जेव्हा पंतप्रधान म्हणून सेवेची संधी दिली. त्यानंतर कृषी क्षेत्राच्या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे”, असं यांनी सांगितलं.
शेतकऱ्यांच्या विकासासाठी तीन कृषी कायदे आणले होते. छोट्या शेतकऱ्यांना आणखी ताकद मिळावी, वर्षानुवर्षे ही मागणी होती. देशातील कृषी वैज्ञानिक, शेतकरी संघटना यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही कायदे आणले पण केंद्रीय कृषी कायद्यांचा विषय सुप्रीम कोर्टात गेला. आता आम्ही हे कायदे रद्द करत असल्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
PM MODI LIVE: Good news for farmers! Today is Guru Nanak Jayanti – Three agricultural laws repealed
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी