विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला रात्री 8.45 वा. संबोधित करणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत.PM MODI LIVE @ 8.45
देशातील कोरोना रुग्णांची संख्या दररोज नवनवे उच्चांक प्रस्थापित करत आहे. गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे २,७३,८१० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १,६१९ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा दीड कोटींच्या पलीकडे जाऊन पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर आता मोदी सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.