• Download App
    पीएम मोदी या महिन्यात अमेरिका दौऱ्यावर जाण्याची शक्यता, जो बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर होणार पहिली भेट । PM Modi Likely To Visit America Later This Month But No Official Confirmation It Yet

    पीएम मोदी या महिन्यात अमेरिका दौऱ्यावर जाण्याची शक्यता, जो बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर होणार पहिली भेट

    PM Modi Likely To Visit America : पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाऊ शकतात, त्यांचा 23-24 सप्टेंबर रोजी दोन दिवसांचा दौरा असेल. या भेटीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. PM Modi Likely To Visit America Later This Month But No Official Confirmation It Yet


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाऊ शकतात, त्यांचा 23-24 सप्टेंबर रोजी दोन दिवसांचा दौरा असेल. या भेटीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

    सूत्रांकडून सांगितले जात आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा तिसऱ्या आठवड्यात शक्य आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या वार्षिक उच्चस्तरीय अधिवेशनात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी न्यूयॉर्कला जातील.

    भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा एक अस्थायी सदस्य आहे आणि त्याचे एक महिन्याचे अध्यक्षपद गेल्या महिन्यात संपले. जो बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची ही पहिली भेट असेल. याआधी 2019 मध्ये ते अमेरिकेत गेले होते.

    जो बायडेन राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिला दौरा असेल. यापूर्वी 2019 मध्ये ते अमेरिकेत गेले होते. याशिवाय अफगानिस्तानावर तालिबानी राजवटीनंतर जगभरातील चिंता वाढली आहे. यादरम्यानच पीएम मोदींचा हा दौरा विशेष ठरण्याची शक्यता आहे.

    PM Modi Likely To Visit America Later This Month But No Official Confirmation It Yet

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत

    Rahul Gandhi in the press conference : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या ‘राजुरा’ मतदारसंघात कोण जिंकलं ?

    Election Commissioner : निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करता येतो का ? काय आहेत कायद्यातील तरतुदी