विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – जेवढ्या वेळेस सोमनाथ मंदिर पाडले गेले तेवढ्या वेळेस ते नव्या दिमाखाने उभे राहिले. भगवान सोमनाथाचे हे मंदिर भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगासाठी श्रद्धा, विश्वास व आश्वासनाचे प्रतीक आहे असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.PM Modi launches new schemes in Somnath
सोमनाथ मंदिराच्या विकासाच्या ८३ कोटी रुपये खर्चाच्या ४ परियोजनांचे उद्घाटन व मुख्य मंदिराच्या जवळच ३० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या पार्वती मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
या व्हर्च्युअल कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी आदी सहभागी झाले होते. यावेळी मोदी म्हणाले, की दहशतवादाच्या जोरावर साम्राज्य उभारणाऱ्या कोणत्याही शक्ती मानवतेला जास्त दिवस दडपून ठेवू शकत नाही. सत्याला असत्याने जास्त काळ झाकता येत नाही हे साऱ्या जगात दिसत आहे.
सोमनाथ मंदिराचेच उदाहरण घेतले तर अनेक शतकांत हे ज्योतिर्लिंग मंदिर कितीतरी वेळा तोडण्यात आले. मूर्ती फोडण्यात आल्या, सोमनाथांचे अस्तित्व संपवून टाकण्याचा प्रयत्न केला गेला. कोणत्याही काळात असो, हिंसाचार काही काळापुरता वर्चस्व गाजवतो पण जास्त दिवस सत्याला दाबून, दडपून ठेवले जाऊ शकत नाही.
PM Modi launches new schemes in SomnathPM Modi launches new schemes in Somnath
महत्त्वाच्या बातम्या
- जागतिक प्रतिकूल घडामोडीमुळे सेन्सेक्स ३०० अंशांनी गडगडला, बाजारात जोरदार झाली नफावसुली
- तिबेटसाठी चिनी ड्रॅगनने आखली नवी रणनीती, चिनी भाषा, चिन्हांच्या वापराचा ठोस आग्रह
- गुजरात सरकारच्या धर्मांतरविरोधी कायद्यातील तरतुदी हायकोर्टाने वगळल्या
- तालीबान सरकारची आर्थिक कोंडी,आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज देण्यास नकार