विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या अंतर्गत प्रत्येक देशवासीयांना आता स्वतःचे युनिक हेल्थ कार्ड मिळणार आहे. हे कार्ड पूर्णपणे डिजिटल आणि आधारकार्ड सारखे असेल. यावर सर्वांना एक नंबर दिला जाईल. या कार्डमध्ये आरोग्याशी संबंधित सर्व नोंदणी केल्या जातील. आज सकाळी 11 वाजता मोदी यांनी आयुष्मान डिजिटल भारतचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुभारंभ केला.
PM modi launch ayushman Bharat digital mission today, Now everyone will get an Health Id for maintaining their Health records
पंतप्रधान मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून या आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या प्रोजेक्टची घोषणा केलेली होती. मोदी यांनी तीन वर्षापूर्वी सुरु केलेल्या आयुष्मान भारत योजनेअंतर्गत सुमारे १० कोटींपेक्षा अधिक कुटुंबांना ५ लाख रुपयांचे आरोग्य संरक्षण मिळते. सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) वेबसाईटने ही माहिती दिलेली आहे.
आयुष्मान भारत डिजिटल मिशन योजनेअंतर्गत दिले गेलेले युनिक हेल्थ कार्ड हे आधार कार्ड प्रमाणे असेल. यातील क्रमांकाद्वारे व्यक्तीची ओळख पटेल व एका क्लिकवर त्याच व्यक्तीची वैद्यकीय पार्श्वभूमी ही कळेल. व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित प्रत्येक नोंदणी यामध्ये असेल. त्यामुळे रुग्णाला जास्त फाईल्स बाळगाव्या लागणार नाहीत. त्याचबरोबर व्यक्तीला कुठे उपचार मिळाले आहेत हेही या कार्डमुळे कळणार आहे.
सार्वजनिक रुग्णालये, सामुदायिक आरोग्य केंद्र येथील आरोग्य सेवा प्रदाता व्यक्तीचे आय.डी. तयार करू शकतात. तसेच आरोग्य आणि निरोगी केंद्र, राष्ट्रीय आरोग्य इन्फ्रास्ट्रक्चर रजिस्ट्रीशी संलग्न असलेले आरोग्य प्रदाता ही व्यक्तीचे आयडी बनवू शकतात. तसेच आपण स्वतः या नोंदी करून आयडी तयार करु शकता त्यासाठी https:/healthif.ndhm.gov.in/register या साईटवर करू शकता.
PM modi launch ayushman Bharat digital mission today, Now everyone will get an Health Id for maintaining their Health records
महत्त्वाच्या बातम्या
- अमेरिकेतून परतल्यावर पंतप्रधान मोदी थेट पोचले विस्टा प्रोजेक्ट पाहायला; एक तास घेतला आढावा
- “भारताला हिंदूराष्ट्र घोषित करा, अन्यथा जलसमाधी”; अयोध्येतील धर्मसंसदेत संत परमहंस यांची घोषणा
- महाराष्ट्र व गुजरातला परतीचा पाऊस झोडपणार, आज, उद्या मुसळधार कोसळणार; शास्त्रज्ञाचा इशारा
- SARTHI PUNE : छत्रपती संभाजीराजे ‘सारथी’ चे सारथी ! यूपीएससी निकालातून ‘सारथी’चे महत्त्व पुन्हा अधोरेखित ; संभाजीराजेंच ट्विट