विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : PM Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एसआयआर नंतर पश्चिम बंगालच्या पहिल्याच भेटीत घुसखोरी, एसआयआर आणि निवडणुकांचा मुद्दा उपस्थित केला. १८ हजार ६८० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करताना मोदींनी तृणमूल काँग्रेसवर “घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी’ एसआयआरला विरोध केल्याचा आरोप केला. तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत राज्यातील अनेक भागांत लोकसंख्या संतुलन बिघडले.PM Modi
एप्रिलच्या विधानसभा निवडणुकीत “क्रूर’ ममता सरकारला उलथवून टाकण्यासाठी उलट गणती सुरू झाली आहे. तृणमूल जाणूनबुजून अनेक भागात बंगाली हिंदूंना अल्पसंख्याक बनवत आहे. सुरक्षा, रोजगार, “कट-मनी’ संस्कृती आणि “जंगल राज’ संपवू असे सांगून मोदींनी नवीन बंगालसाठी “क्रांती’ सुरू झाल्याचे जाहीर केले. कोलकात्याच्या ब्रिगेड परेड ग्राउंड येथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी बोलत होते.PM Modi
मंचावर दक्षिणेश्वर काली मंदिराची प्रतिकृती
पश्चिम बंगालमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप विविध युक्त्या वापरून पाहत आहे. शनिवारी झालेल्या सभेत पंतप्रधान मोदींसाठी उभारलेल्या व्यासपीठावर दक्षिणेश्वर काली मंदिराची प्रतिकृती तयार केली होती. प्लायवूड, प्लास्टर आणि थर्माकोलपासून बनवलेल्या या मंदिराला पाच दिवसांत ५० कारागिरांनी भव्य स्वरूप दिले.
तृणमूल-भाजप कार्यकर्ते सभेआधी भिडले
पंतप्रधानांच्या जाहीर सभेच्या अर्धा तास आधी तृणमूल आणि भाजप समर्थकांमध्ये संघर्ष झाला. त्यात एक पोलिस अधिकारी आणि एक भाजप नेता जखमी झाला. पश्चिम बंगालच्या मंत्री शशी पांजा यांच्या निवासस्थानी दगडफेक करण्यात आली. रॅलीच्या ठिकाणापासून सुमारे ५ किलोमीटर अंतरावर भाजप समर्थक मेळाव्यापर्यंत पोहोचण्यासाठी कूच करत असताना धुमश्चक्री उडाली. पांजा म्हणाल्या की हल्लेखोरांनी बाहेरून विटा फेकल्या. त्यापैकी एक वीट त्यांच्या पोटास लागली.
TMC Turning Bengali Hindus into Minorities: PM Modi’s Sharp Attack in Kolkata VIDEOS
महत्वाच्या बातम्या
- विलीनीकरणाच्या विषयाला जयंत पाटलांकडून पुन्हा उकळी; भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जायची तडफड दिसली!!
- महाराष्ट्रात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही, LPG चे वाढविले उत्पादन; छगन भुजबळांची माहिती
- राहुल गांधींचा कांशीरामांच्या राजकीय वारसावर डल्ला; उत्तर प्रदेशातले काँग्रेसचे सगळे Political Icons संपले??
- Vijay Wadettiwar : जनगणनेत ओबीसींचा वेगळा रकाना टाकावा; विजय वडेट्टीवार यांची मागणी