• Download App
    PM Modi independence day speech 2025 पंतप्रधान मोदींच्या भाषणात तरुणांसाठी काय?, ट्रम्प

    पंतप्रधान मोदींच्या भाषणात तरुणांसाठी काय?, ट्रम्प + पाकिस्तानला कोणता इशारा?; स्वदेशी + सुदर्शन चक्राचा आक्रमक नारा!!

    PM Modi

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 79 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आज लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. यावेळी लाल किल्ल्यावरुन नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी पाकिस्तान आणि अमेरिकेला इशारा देखील नरेंद्र मोदी यांनी दिला. त्यात त्यांनी स्वदेशीच्या ताकदीचा आणि सुदर्शन चक्राचा आक्रमक नारा दिला.PM Modi independence day speech 2025

    पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले :

    – दिवाळीत मोठी भेट देणार

    – आम्ही जे काही करत आहोत ते आम्ही देशासाठी करत आहोत, अन्य कुणाचेही नुकसान करण्यासाठी नाही. आपल्या देशातील राजकीय पक्षांनी या सुधारणेत आमच्यासोबत सामील व्हावे. या दिवाळीत तुम्हाला एक मोठी भेट मिळणार आहे. आम्ही सलग आठ वर्षे जीएसटी कमी करण्यासाठी काम केले आहे. आम्ही पुढच्या पिढीच्या जीएसटीवर काम करत आहोत आणि या दिवाळीत आपण खरेदी केलेल्या आणि दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तू खूप स्वस्त होतील. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.



    – तरुणांसाठी केली मोठी घोषणा

    – आज, 15 ऑगस्ट रोजी, आम्ही पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेअंतर्गत देशातील तरुणांसाठी 1 लाख कोटी रुपयांच्या योजना राबवत आहोत. खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्यांना 15,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी आणणाऱ्या कंपनीलाही प्रोत्साहन मिळेल. याचा फायदा 3.5 कोटी तरुणांना होईल.

    – जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार

    – आम्ही सुधारणा योग्यरित्या अंमलात आणण्यासाठी एक टास्क फोर्स तयार केला आहे. 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्यासाठी ही शक्ती स्थापन करण्यात आली आहे. देशाला विकसित करण्यासाठी सुधारणा नव्याने अंमलात आणण्यास ही शक्ती मदत करेल. आपण जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहोत आणि एक वेळ येईल जेव्हा लाल किल्ल्यावरून तुम्हाला हा संदेश दिला जाईल. आज महागाई नियंत्रणात आहे आणि आपला साठा मजबूत आहे, सूक्ष्म अर्थव्यवस्था मजबूत आहे आणि जागतिक रेटिंग एजन्सी भारताच्या अर्थव्यवस्थेवर विश्वास व्यक्त करत आहेत आणि आपल्या देशातील शेतकरी, महिला आणि देशवासीयांना त्याचा जास्तीत जास्त फायदा मिळावा यासाठी आम्ही सतत काम करत आहोत.

    – वर्षाच्या अखेरीस आम्ही मेड इन इंडिया चिप्स आणणार-

    – आज जगभर तंत्रज्ञानाबद्दल चर्चा आणि विकास होत आहे. आज मी इथे कोणावरही टीका करण्यासाठी आलो नाहीये. पण चार-पाच दशकांपूर्वी आपल्या देशात सेमीकंडक्टरबद्दल चर्चा होत होती, पण कोणीही लक्ष दिले नाही आणि ती कल्पना रद्द करण्यात आली. पण आम्ही हा अपराध दूर करण्यासाठी काम केले आहे आणि जमिनीवर 6 युनिट्स उभारत आहोत आणि वर्षाच्या अखेरीस आम्ही मेड इन इंडिया चिप्स आणू, अशी माहिती नरेंद्र मोदींनी दिली.

    – स्वाभिमानाचा सर्वात मोठा निकष स्वावलंबन-

    – गुलामगिरीने आपल्याला गरीब बनवले होते. हे तेच शेतकरी आहेत, ज्यांनी कष्ट करून देशाचे धान्याची कोठारे भरले आणि देशाला अन्नधान्यात स्वयंपूर्ण केले. आजही स्वाभिमानाचा सर्वात मोठा निकष स्वावलंबन आहे. आज विकसित भारताचा पाया देखील स्वावलंबन आहे. म्हणून, जितके ते इतरांवर अवलंबून असेल तितकेच त्याला गुलामगिरीची भीती जास्त असते. जर तुम्हाला त्याची सवय झाली तर तुम्ही कधी गुलाम किंवा इतरांवर अवलंबून राहता हे तुम्हाला कळतही नाही. रुपया आणि डॉलर हे फक्त स्वावलंबन नसतात, त्यांचा अर्थ ताकद असतो. जर स्वावलंबन कमी झाले तर ताकदही कमी होते. स्वतःच्या ताकदीचे रक्षण आणि देखभाल करण्यासाठी स्वावलंबन खूप महत्वाचे आहे.

    – सिंधू नदीच्या पाण्यावर भारताचा हक्क

    – अण्वस्त्रांच्या धमक्यांना आम्ही आता भीक घालत नाही-

    आज आपल्याला लाल किल्ल्यावरून ऑपरेशन सिंदूरच्या शूर सैनिकांना सलाम करण्याची संधी मिळाली आहे. आपल्या शूर सैनिकांनी शत्रूंना त्यांच्या कल्पनेपलीकडे शिक्षा दिली आहे. अण्वस्त्रांच्या धमक्यांना आम्ही आता भीक घालत नाही, असा इशारा देखील नरेंद्र मोदींनी दिला. सिंधू पाणीवाटप करार अन्यायकारक होता, हे देशाला समजलंय‌.

    – स्वदेशीचा वापर ताकद

    – स्वदेशीचा वापर सक्ती म्हणून नाही तर ताकदीसाठी करू-
    जर आपण देशाच्या मातीचा सुगंध असलेल्या सर्व वस्तू खरेदी केल्या आणि भारताला समृद्ध करण्यासाठी देशाच्या वस्तू देखील खरेदी केल्या, तर तुम्हाला दिसेल की देश पुढे जाईल. देशातील व्यापाऱ्यांनीही येथे स्वदेशी वस्तू विकल्या जातात, असे फलक लावावेत. आपण स्वदेशीचा वापर सक्ती म्हणून नाही तर ताकदीसाठी करू आणि गरज पडली तर आपण दुसऱ्याला भाग पाडण्यासाठीही त्याचा वापर करू, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

    – ट्रम्पला इशारा

    – शेतकरी आणि मच्छिमाऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही-
    शेतकरी आणि मच्छिमाऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही. भारतीयांनी ‘वोकल फॉर लोकल’हा नवा मंत्र बनवावा, असं नरेंद्र मोदी म्हणाले. भारतीयांनी स्वदेशी वस्तुंच्या खरेदीचा आग्रह धरावा. मेड-इन-इंडिया फायटर जेट भारतात बनू शकत नाही का?, भारताचं धन भारतातच राहावं, परदेशात का जावं? भारतीय कंपन्यांनी भारतातच खत बनवावं, आयाती खत नको, महत्वाच्या खनिजांत आत्मनिर्भरता आणू. दुसऱ्याची रेष छोटी करण्यात शक्ती घालवण्यापेक्षा स्वतःची रेषा मोठी करू.

    – भाषणात महात्मा ज्योतिबा फुलेंचा उल्लेख

    – महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त आपण कार्यक्रम सुरू करणार आहोत. मागासवर्गीयांना प्राधान्य देऊन आपल्याला बदल घडवायचा आहे. आपल्याला प्रत्येक मागासवर्गीय व्यक्तीच्या जीवनात तो आणायचा आहे. आज जेव्हा मी देशात खेळांना चालना मिळते तेव्हा माझे हृदय आनंदाने भरून येते. आपण राष्ट्रीय क्रीडा धोरण आणि खेलो इंडिया धोरण घेऊन आलो आहोत. आपल्याला शाळेपासून ऑलिम्पिकपर्यंत एक परिसंस्था निर्माण करायची आहे. आपल्याला या परिसंस्थेत लघु उद्योगांचाही समावेश करायचा आहे, असं नरेंद्र मोदींनी सांगितले.

    – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला माझा सलाम-

    भारत देश लाखो लोकांनी बनवला आहे आणि देशातील प्रत्येक व्यक्ती देश बनवते. 100 वर्षांपूर्वी, एक संघटना जन्माला आली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जन्माला आला ज्याने व्यक्ती निर्माण करून राष्ट्र उभारणीसाठी सतत काम केले आहे आणि स्वतःला देशासाठी समर्पित केले आहे. एकाप्रकारे, ही जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था आहे जी देशासाठी सतत काम करत आहे, मी तिला सलाम करतो.

    – सुदर्शन चक्र मिशनची घोषणा-

    – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या सुरक्षेबाबत फार मोठी घोषणा केली. त्यांनी सुदर्शन चक्र मिशनची घोषणा केली आहे. ही एक शक्तिशाली शस्त्र प्रणाली असेल, ती केवळ शत्रूच्या हल्ल्याला निष्प्रभ करेलच असे नाही, तर अनेक पटींनी प्रत्युत्तर देखील देईल, असे नरेंद्र मोदींनी सांगितले.

    PM Modi independence day speech 2025

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    भाषा जेवढ्या समृद्ध होतील तेवढं ज्ञानव्यवस्थेला सामर्थ्य, पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे प्रतिपादन

    मोदी + भागवतांच्या भाषणांचे एकच सूत्र; स्वदेशीच्या ताकदीवर भर देऊन जगात निर्माण करू “स्व” “तंत्र”!!

    President Murmu : राष्ट्रपती म्हणाल्या- ऑपरेशन सिंदूरने पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर दिले, काश्मीरमध्ये ट्रेन पोहोचणे ही मोठी कामगिरी