• Download App
    PM Modi In UNSC : मोदी म्हणाले, पायरसी आणि दहशतवादासाठी सागरी मार्गांचा दुरुपयोग, सागरेच आंतरराष्ट्रीय व्यापाराची लाइफलाइन । pm modi in UNSC says Oceans are our shared heritage and our maritime routes are lifelines of international trade

    PM Modi In UNSC : मोदी म्हणाले, पायरसी आणि दहशतवादासाठी सागरी मार्गांचा दुरुपयोग, सागरेच आंतरराष्ट्रीय व्यापाराची लाइफलाइन

    pm modi in UNSC : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘समुद्री सुरक्षा प्रोत्साहन : आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज’ या विषयावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (यूएनएससी) उच्चस्तरीय खुल्या चर्चेचे अध्यक्षपद भूषवले. यादरम्यान ते म्हणाले की, महासागर हा आपला सामायिक वारसा आहे. आमचे सागरी मार्ग हे आंतरराष्ट्रीय व्यापाराची जीवनरेखा आहेत आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे समुद्र आपल्या ग्रहाच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, परंतु आपला सामायिक सागरी वारसा आज अनेक आव्हानांना सामोरे जात आहे. pm modi in UNSC says Oceans are our shared heritage and our maritime routes are lifelines of international trade


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘समुद्री सुरक्षा प्रोत्साहन : आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज’ या विषयावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (यूएनएससी) उच्चस्तरीय खुल्या चर्चेचे अध्यक्षपद भूषवले. यादरम्यान ते म्हणाले की, महासागर हा आपला सामायिक वारसा आहे. आमचे सागरी मार्ग हे आंतरराष्ट्रीय व्यापाराची जीवनरेखा आहेत आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे समुद्र आपल्या ग्रहाच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, परंतु आपला सामायिक सागरी वारसा आज अनेक आव्हानांना सामोरे जात आहे.

    मोदी म्हणाले की, “पायरसी आणि दहशतवादासाठी समुद्री मार्गांचा गैरवापर केला जात आहे. अनेक देशांमध्ये सागरी वाद आहेत आणि हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्ती हादेखील सागरी क्षेत्राशी संबंधित विषय आहेत. मी तुमच्यासमोर पाच मूलभूत सिद्धांत मांडू इच्छितो.

    सिद्धांत 1 : कायदेशीर सागरी व्यापाराचे अडथळे आपण दूर केले पाहिजेत. आपल्या सर्वांची समृद्धी सागरी व्यापाराच्या सक्रिय प्रवाहावर अवलंबून आहे. यामधील अडथळे संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेसाठी आव्हान ठरू शकतात.

    सिद्धांत 2 : सागरी वाद शांततेने आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आधारावर सोडवायला हवेत. परस्पर विश्वास आणि सहकार्यासाठी हे आवश्यक आहे. जागतिक शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्याचा हा एकमेव मार्ग आहे.

    सिद्धांत 3 : आपण नैसर्गिक आपत्ती आणि समुद्री धोक्यांना सामोरे जावे जे बिगर राजकीय कारणांनी निर्माण केले आहेत. भारताने या विषयावर प्रादेशिक सहकार्य वाढवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. आम्ही चक्रीवादळ, त्सुनामी आणि प्रदूषणाशी संबंधित सागरी आपत्तींना प्रथम प्रतिसाद देणारे आहोत.

    आम्हाला सागरी पर्यावरण आणि सागरी संसाधने जपायची आहेत : पंतप्रधान मोदी

    सिद्धांत 4 : आपल्याला सागरी पर्यावरण आणि सागरी संसाधने जपायची आहेत. आपल्याला माहीत आहे की, महासागराचा वातावरणावर थेट परिणाम होतो आणि म्हणूनच आपल्याला आपले सागरी पर्यावरण प्लास्टिक आणि तेल गळतीसारख्या प्रदूषणापासून मुक्त ठेवायचे आहे.

    सिद्धांत 5 : आपण जबाबदार सागरी कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन दिले पाहिजे. हे स्पष्ट आहे की सागरी व्यापार वाढवण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे, परंतु अशा पायाभूत प्रकल्पांच्या विकासासाठी देशांची आर्थिक स्थिरता आणि अवशोषण क्षमता विचारात घ्यावी लागेल.

    उल्लेखनीय बाब म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ओपन डिबेटची अध्यक्षता करणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.

    pm modi in UNSC says Oceans are our shared heritage and our maritime routes are lifelines of international trade

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Delhi High Court पत्नीला पतीची संपत्ती मानण्याची कल्पना असंवैधानिक; दिल्ली उच्च न्यायालयाने दिला महाभारतातील द्रौपदीचा संदर्भ

    मुर्शिदाबाद मधील दंगल पीडित महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी बंगाल सरकारची, त्यात राजकारण आणि कुचराई नको; NCW अध्यक्षांनी सुनावले!!