विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसची हिंमत असेल, तर त्यांनी मुस्लिम व्यक्तीला अध्यक्ष करून दाखवावे आणि निवडणुकीची 50 % तिकीटे मुस्लिम समाजाला देऊन दाखवावीत, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातला हिस्सार मधून काँग्रेसला दिले, पण काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मात्र तो विषय डायव्हर्ट करत बाबासाहेब आंबेडकरांना हरविण्याचा कट कम्युनिस्ट नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे आणि सावरकरांनी रचल्याचा आरोप केला. Mallikarjun Kharge
बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी हरियाणातील हिस्सार आणि यमुनानगर इथल्या विकास कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभ सहभाग नोंदविला. या दोन्ही ठिकाणी भाषण करताना त्यांनी काँग्रेसला ठोकून काढले. आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने त्यांनी राज्यघटना आंबेडकर काँग्रेस आणि waqf सुधारणा कायदा या मुद्द्यांवर भर देणारी भाषणे केली. बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्याही धार्मिक आधारावर आरक्षण नको होते. त्यामुळे त्यांनी राज्यघटनेत धार्मिक आरक्षणाची तरतूद अजिबात केली नाही, पण काँग्रेसने राज्यघटना सत्तेच्या हत्यारासारखी वापरली आणि मुस्लिम कट्टरपंथीयांना पाठबळ दिले. पसमांदा मुस्लिम, मुस्लिम महिला आणि मुस्लिम विधवा यांना वाऱ्यावर सोडले, असा आरोप मोदींनी केला.
त्या पलीकडे जाऊन पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला आव्हान दिले. काँग्रेसची हिंमत असेल, तर त्यांनी मुस्लिम व्यक्तीला पक्षाध्यक्ष करून दाखवावे आणि निवडणुकीची 50 % तिकीटे मुस्लिमांना देऊन दाखवावीत, असे मोदी म्हणाले.
मोदींच्या या वक्तव्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रत्युत्तर दिले. यामध्ये त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या निवडणुकीचा विषय काढला. 1952 च्या लोकसभा निवडणुकीत बाबासाहेबांचा पराभव झाला होता, तो पराभव घडवून आणण्याचा कट कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे आणि सावरकर यांनी रचला होता, असे खुद्द बाबासाहेबानी 18 जानेवारी 1952 च्या पत्रामध्ये लिहिले आहे, असा दावा मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. आज सावरकरांचे चेले सत्तेवर आहेत आणि ते काँग्रेसवर बाबासाहेबांचा अपमान केल्याचा खोटा आरोप करत आहेत हे सगळे जनतेला समजते, असा टोलाही मल्लिकार्जुन खर्गे यांनी हाणला.
PM Modi in his speech alleging Congress of using the Constitution as a weapon for its vote bank, Congress President Mallikarjun Kharge
महत्वाच्या बातम्या
- पवार काका – पुतणे एकत्र येण्यात गैर काय? प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्याने राजकीय चर्चा
- Ukraine : दावा- युक्रेनमधील भारतीय गोदामावर रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला; युक्रेनने म्हटले- रशियाने मुद्दाम केले
- Trump : ट्रम्प यांनी स्मार्टफोन, संगणकांना परस्पर शुल्कातून सूट दिली; लॅपटॉप, सेमीकंडक्टर, सोलर सेल्सना सूट नाही
- Sukhbir Badal : सुखबीर बादल पुन्हा अकाली दल प्रमुख बनले; 5 महिन्यांनी वापसी; तनखैया घोषित केले होते