• Download App
    पाटणा साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी NIA कोर्टाने सुनावला निकाल, 4 दोषींना फाशीची शिक्षा, तर दोघांना जन्मठेप|PM Modi Hunkar Rally Bomb Blast 2013 patna serial blasts nia special court pronounce verdict death sentence to 4 convicts

    पाटणा साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी NIA कोर्टाने सुनावला निकाल, 4 दोषींना फाशीची शिक्षा, तर दोघांना जन्मठेप

    बिहारची राजधानी पाटणा येथील गांधी मैदानात 2013 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) विशेष न्यायालयाने 4 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्याच वेळी, दोन दोषींना जन्मठेपेची, तर 2 दोषींना 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय आणखी एका दोषीला ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.PM Modi Hunkar Rally Bomb Blast 2013 patna serial blasts nia special court pronounce verdict death sentence to 4 convicts


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : बिहारची राजधानी पाटणा येथील गांधी मैदानात 2013 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) विशेष न्यायालयाने 4 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्याच वेळी, दोन दोषींना जन्मठेपेची, तर 2 दोषींना 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय आणखी एका दोषीला ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

    गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी 27 ऑक्टोबर 2013 रोजी पाटणा येथील गांधी मैदानावर आयोजित भारतीय जनता पक्षाच्या ‘हुंकार रॅली’चे प्रमुख वक्ते होते.

    नरेंद्र मोदींसह पक्षाचे नेते मंचावर पोहोचण्यापूर्वी सुमारे 20 मिनिटेआधी मैदानात साखळी बॉम्बस्फोट घडले, ज्यामध्ये सहा जण ठार आणि 90 हून अधिक जखमी झाले. मात्र, या स्फोटांना न जुमानता ही सभा झाली आणि नरेंद्र मोदींनीही त्यात भाषण केले होते.

    पहिला स्फोट पाटणा रेल्वे स्थानकाजवळ झाला, त्यानंतर गांधी मैदानाजवळ एकापाठोपाठ एक स्फोट झाले. याप्रकरणी एनआयएने घटनेच्या दुसऱ्या दिवसापासून तपास सुरू केला. वर्षभरात 21 ऑगस्ट 2014 रोजी एनआयएने एकूण 11 आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. 2018 मध्ये या खटल्याची सुनावणी सुरू झाली होती.

    PM Modi Hunkar Rally Bomb Blast 2013 patna serial blasts nia special court pronounce verdict death sentence to 4 convicts

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!