• Download App
    मोदींनी स्वतःच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले, धावपळ करून स्वागताला यायची गरज नाही!! pm modi explain why he asked karnataka cm , governor skip protocol

    मोदींनी स्वतःच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले, धावपळ करून स्वागताला यायची गरज नाही!!

    वृत्तसंस्था

    बेंगलोर : दक्षिण आफ्रिका आणि ग्रीसचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी राजधानी नवी दिल्लीत न परतता थेट बंगलोरला गेले आणि त्यांनी चांद्रयान 3 मोहीम यशस्वी करणाऱ्या इस्रोच्या वैज्ञानिकांची भेट घेतली. त्यांची पाठ थोपटली. pm modi explain why he asked karnataka cm , governor skip protocol

    मात्र, त्यावेळी पंतप्रधानांच्या प्रोटोकॉलचा वाexp[द उत्पन्न झाला. कर्नाटकचे राज्यपाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या स्वागताला विमानतळावर कसे पोहोचले नाहीत?? किंवा इस्रो मध्ये ते तिघेही पंतप्रधानांबरोबर का नव्हते??, असे सवाल माध्यमांमधून उमटले.

    मात्र स्वतः पंतप्रधान मोदी यांनीच या संदर्भात स्पष्ट खुलासा केला. परदेश दौऱ्यावरून परतताना मी स्वतःच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, राज्यपाल आणि उपमुख्यमंत्री यांना विनंती केली, की तुम्ही इतक्या पहाटे विमानतळावर स्वागताला येण्याची तसदी घेऊ नका. मला इस्रोच्या वैज्ञानिकांना भेटल्याशिवाय राहावत नाही म्हणून मी पहाटे येतो आहे. त्यात आपण प्रोटोकॉल पाळण्याची तसदी घेऊन विमानतळावर येण्याचे धावपळ करू नये.

    पंतप्रधान मोदींनी स्वतःच विनंती केल्यामुळे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे बंगलोर विमानतळावर त्यांच्या स्वागताला हजर राहिले नाहीत

    pm modi explain why he asked karnataka cm , governor skip protocol

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    GST collection : डिसेंबरमध्ये GST संकलन 6.1% नी वाढून ₹1.74 लाख कोटींच्या पुढे; कर कपातीनंतरही महसुलात वाढ

    Vande Bharat : पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन गुवाहाटी-कोलकातादरम्यान धावणार; थर्ड एसीचे भाडे ₹2,300, वैष्णव म्हणाले- बुलेट ट्रेन 15 ऑगस्ट 2027 पर्यंत येईल

    Indore  Contaminated : इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे 14वा मृत्यू; 162 जण भरती; मृतांच्या नातेवाईकांनी चेक घेण्यास नकार दिला